आता शालेय आहार तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा
By Admin | Updated: July 29, 2014 23:57 IST2014-07-29T23:57:58+5:302014-07-29T23:57:58+5:30
विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा, ते शिजविण्याचे ठिकाण (स्वयंपाक गृह) स्वच्छ व आरोग्यदायी असावे याबाबत खात्री करण्यासाठी केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणाली व तपासणीची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार

आता शालेय आहार तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा
बंडू बण - नारायणपूर
विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा, ते शिजविण्याचे ठिकाण (स्वयंपाक गृह) स्वच्छ व आरोग्यदायी असावे याबाबत खात्री करण्यासाठी केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणाली व तपासणीची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे़ यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना आता पोषण आहार मिळण्यास मदत होणार आहे़
इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना दशकापूर्वी सुरू केली होती योजनेतील गैरप्रकार, तांदळाची हेराफेरी, निकृष्ट आहार, अनियमित वाटप आदी तक्रारी पूढे आल्या होत्या. यात वेळोवेळी सुधारणा न झाल्याने शासनाने वेळीच स्वंयपाक गृह प्रणाली व तपासणी योजना राबविण्याचे धोरण अवलंबिले आहे़ यात अन्न शिजवण्याच्या व्यवस्थेवर विशेष भर दिला आहे. शासन निर्णयात उच्च न्यायालयाच्या तज्ज्ञांची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत़ यात केंद्रीय स्वंयपाक गृहातील आहाराची तपासणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून वर्षातून २० वेळा होणार असून अन्न पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराचीही तपासणी करण्यात येणार आहे. अन्नाचे नमुने एनएबीएल वा शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. स्वंयपाक गृह तपासणी, धान्याची तपासणी आदी कामावर ही यंत्रणा कटाक्षाने लक्ष ठेवणार आहे़ यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दर्जेदार आहार मिळण्यास मदत होणार असल्याचे दिसते़