शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

आता गावोगावी मिळणार गॅस सिलिंडर

By admin | Updated: December 13, 2014 22:44 IST

अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ, आष्टी तालुका कार्यकारी मंडळ, मानव जोडो संघटन, श्री गुरूदेव युवा संघटन यांनी संयुक्तरित्या १ जुलै रोजी तहसीलदारांना गॅस सिलिंडर वितरक नरेंद्र दाभे विरूद्ध

साहुर : अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ, आष्टी तालुका कार्यकारी मंडळ, मानव जोडो संघटन, श्री गुरूदेव युवा संघटन यांनी संयुक्तरित्या १ जुलै रोजी तहसीलदारांना गॅस सिलिंडर वितरक नरेंद्र दाभे विरूद्ध तक्रार दिली. कारवाई न झाल्याने ९ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले़ दुसऱ्याच दिवशी दाभे याने सिलिंडर भरून गाडी साहूर येथे पाठविली; पण तहसीलदार लेखी देत नाही, तोपर्यंत कुणीही सिलिंडर घेणार नाही, असे ठरविण्यात आले़ अखेर बुधवारी (दि़१०) तहसीलदारांनी प्रत्येक गुरूवारी गावोगावी सिलिंडर वाटप करण्याचे लेखी दिले़ यानंतर सर्व ग्राहकांना रितसर सिलिंडर वाटप करण्यात आले़ संपूर्ण तालुक्यात गावोगावी जाऊन सिलिंडर वाटप करण्याचे आदेश असताना अनुसया गॅस एजन्सीचे मालक दाभे, त्यांच्या पत्नी व मुलगा ग्राहकांना हुसकावून लावत होते़ प्रत्येक गावातील दलालांना तो ५० सिलिंडर आधीच चढ्या भावात देत होता़ अनेक ग्राहकांपासून १००० ते १२०० रुपये दर आकारून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत होता़ या दादागिरीमुळे संपूर्ण तालुका त्रस्त होता. याविरूद्ध आष्टी येथील संदीप अग्रवाल यांनी न्यायालयात प्रकरणही दाखल केले होते़ शेकडो खोटे ग्राहक तयार करून दलालांमार्फत त्याने सामान्य जनतेची पिळवणूक करून अल्पावधीत मोठी माया गोळा केली. याविरूद्ध गुरूदेव सेवा मंडळ आष्टीचे तालुका सेवाधिकारी दीपक खरडे, मानवजोडो संघटनचे रमेश सरोदे व युवा संघटन साहुर यांनी उपोषणाचे शस्त्र उगारले़ या सत्याग्रहाने दाभे याचे धाबे दणानले़ प्रत्येक गुरूवार आणि ज्याला मधे सिलिंडर लागेल, त्यालाही सिलिंडर आणून देईल, अशी विनंती त्यांनी केली़ तहसीलदार आष्टी यांनी उपोषण स्थळी प्रतिक दाभे यास बोलवून चर्चा केली़ प्रत्येक ग्राहकाशी आदरपुर्वक वागण्याची समज दिली. यावेळी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या़ तहसीलदारांनी प्रत्येक गुरूवारी गावोगावी सिलिंडर पोहोचण्यिात येतील, अशी लेखी ग्वाही दिली़ या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले़ उपोषणकर्त्यांमध्ये वयोवृद्ध बाळकृष्ण कडू, जयप्रकाश भोरे, दीपक खरडे, प्रशांत ढोले, विशाल लाड, पांडुरंग हिवरे, बाबाराव वरकड, दीपक काकपुरे, सुरेश ठाकरे, वासुदेव चांदुरकर आदींचा सहभाग होता़ उपोषणाचे हत्यार उपसताच सिलिंडर वितरक वठणीवर आल्याने तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे़(वार्ताहर)