आता रंगणार झेडपीच्या पदाधिकाऱ्यांचा रणसंग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:53+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपला आहे. मात्र, प्रारंभी दुष्काळी परिस्थिती व नंतर विधानसभा निवडणूकीचे कारण देऊन शासनाने पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पुढे ढकलली होती. परिणामी आरक्षण ही जाहीर केले नव्हते. आता विधानसभा निवडणूक पार पडली असून लवकरच अध्यक्षपदाकरिता आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मिनी मंत्रालयातील पदाधिकाºयांच्या निवडीचा रणसंग्राम रंगणार आहे.

Now the battle of the ZP office bearers will ring | आता रंगणार झेडपीच्या पदाधिकाऱ्यांचा रणसंग्राम

आता रंगणार झेडपीच्या पदाधिकाऱ्यांचा रणसंग्राम

ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये संपला कार्यकाळ : अध्यक्षपदाचे आरक्षण होणार जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपला आहे. मात्र, प्रारंभी दुष्काळी परिस्थिती व नंतर विधानसभा निवडणूकीचे कारण देऊन शासनाने पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पुढे ढकलली होती. परिणामी आरक्षण ही जाहीर केले नव्हते. आता विधानसभा निवडणूक पार पडली असून लवकरच अध्यक्षपदाकरिता आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मिनी मंत्रालयातील पदाधिकाºयांच्या निवडीचा रणसंग्राम रंगणार आहे.
जि.प.मधील पदाधिकाºयांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असतो. त्यानुसार विद्यमान पदाधिकाºयांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला संपला आहे. दरम्यानच्या काळात दुष्काळी परिस्थितीमुळे वर्धा जि.प.चे अध्यक्ष नितीन मडावी यांच्यासह विदर्भातील अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सहा महिन्याची मुदत वाढ मागितली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी तीन महिन्यांची मुदत वाढ दिली होती. तसेच विधानसभा निवडणुका लक्षात घेता आणखी एका महिन्याची मुदतवाढ दिली होती. आता विधानसभा निवडणूका संपल्याने डिसेंबर महिन्यात पदाधिकाºयांची निवणूक होण्याची शक्यता असल्याने येत्या महिन्याभरात शासनाला आरक्षण जाहीर करावे लागणार आहे. त्यामुळे आगामी अडीच वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोणकोणत्या संवर्गाकरिता आरक्षण जाहीर होते. याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी, विरोधकांचाही सत्तेवर डोळा
जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया अद्याप जाहीर झाली नाही. तरीही जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पुन्हा अडीच वर्षाचा कार्यकाळ आपल्याच ताब्यात रहावा, यासाठी तयारीत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाला शह देऊन सत्ता खेचून आणणसाठी विरोधकांकडून तयारी केली जात आहे. मात्र, यात कुणाला यश येईल, हे निवड प्रक्रियेनंतर दिसून येणार आहे.

Web Title: Now the battle of the ZP office bearers will ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.