शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

आता कपाशीवर लाल ढेकुणाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:27 PM

बोंडअळीच्या संकटात सापडलेला परिसरातील कपाशी उत्पादक शेतकरी सावरण्यापूर्वीच आता त्याच्यासमोर लाल ढेकुणाचे संकट उभे राहिले आहे.

ठळक मुद्देकपाशी उत्पादकावरील संकटाची मालिका कायम : कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : बोंडअळीच्या संकटात सापडलेला परिसरातील कपाशी उत्पादक शेतकरी सावरण्यापूर्वीच आता त्याच्यासमोर लाल ढेकुणाचे संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना तालुक्यातील कृषी विभागाने मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कपाशी पिकावर झाला. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच सध्या कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. गुलाबी बोंडअळीनंतर आता लाल ढेकुणचाही प्रादुर्भाव परिसरातील काही शेतात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे लाल ढेकुण सध्या बोंडअळीपासून वाचलेल्या कापशीचेही नुकसान करीत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. कपाशीच्या एका बोंडात दहा पेक्षा जास्त संख्येने शिवाय कपाशीच्या झाडावरही हे लाल ढेकुण दिसून येत आहे.नाचणगाव, पुलगाव आदी शेतशिवारातील कपाशी पिकावर सध्या हे लाल ढेकुण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पूर्वीच गुलाबी बोंडअळीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून लाल ढेकुण या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेकांसाठी अन्न उगविणाऱ्या अन्नदात्याची आर्थिक परिस्थिती निसर्गाच्या लहरीपणामुळे फार नाजूक अवस्थेत सध्या आली आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तात्काळ परिसरातील कपाशी उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी परिसरातील कपाशी उत्पादकांची आहे.

टॅग्स :cottonकापूस