शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

केवळ स्वाक्षऱ्याच नाही तर अंगठेही

By admin | Updated: May 18, 2016 02:28 IST

शपथपत्रात स्वाक्षऱ्या असणाऱ्यांत जनाबाई लांडगे यांचा ३० वर्षापूर्वी मृत्यू झाला. सुरेश लांडगे २००३ मध्ये मयत झाले.

आष्टी (शहीद) : शपथपत्रात स्वाक्षऱ्या असणाऱ्यांत जनाबाई लांडगे यांचा ३० वर्षापूर्वी मृत्यू झाला. सुरेश लांडगे २००३ मध्ये मयत झाले. मथुराबाई लांडगे ४० वर्षापूर्वी मृत्यू पावल्या तर किसनराव कुरवाडे यांचा गतवर्षी मृत्यू झाला. तरीसुद्धा या लोकांच्या स्वाक्षऱ्या व अंगठे लावून ते जिवंत असल्याचे नाहकरत शपथपत्र तयार केले. ते १७ डिसेंबर २०१५ रोजी आवश्यक खोटे कागदपत्रे जोडून कनिष्ठ अभियंता अंतोरा कार्यालयात अर्ज सादर केला. शेतकऱ्याचा कृषी पंपाकरिता आलेला अर्ज म्हणून वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा दिला. वीज पुरवठा मिळताच शेतीत हिस्सा असलेल्या लांडगे कुटुंबातील सर्वच सदस्यांना आश्चर्य झाले. याची माहिती घेण्याकरिता लांडगे कुटुंबातील रमेश विनायक लांडगे यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात माहितीच्या अधिकारात अर्ज सादर केला. यावर माहिती देण्यात आली. प्राप्त झालेली माहिती पाहून धक्काच बसला. लांडगे कुटुंब हैराण झाले. अर्जावर मृतकांच्या स्वाक्षऱ्या पाहून सारेच दंग झाले. रमेश लांडगे यांनी या प्रकरणाची माहिती वीज वितरण कंपनीच्य आर्वी शाखेचे कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांना दिली. रामहरी कुरवाड याने बनावट शपथपत्र जोडल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला. सर्व माहिती ऐकताच हा अधिकारीही अवाक् झाला. त्यांनी या प्रकरणाची दखल धेत सहायक अभियंता आष्टी कार्यालयाचे एस.जी. टेकाडे यांना भ्रमणध्वनीवर सर्व प्रकार या शेतकऱ्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याच्या सूचना केल्या आहेत. टेकाडे यांनी प्रकरणाचा तपास अंतोरा कार्यालयाचे अभियंता मधुसुदन पेठे यांच्याकडे दिला. पेठे यांनी लागलीच वीजपुरवठा खंडित करून प्राथमिक कारवाई पूर्ण केली असल्याची माहिती आहे.