शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:00 AM

जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रीय आपत्ती ठरू पाहणाºया कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. शिवाय आदेशाचा भंग करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना : नागरिकांनी ई-मेलद्वारे तक्रारी नोंदवाव्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना हा विषाणूजन्य आजाराचा प्रसार गर्दीच्या ठिकाणी झपाट्याने होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात कलम १४४ लागू झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला विनाकारण जिल्हाकचेरीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर कुठलीही समस्या असल्यास नागरिकांनी थेट ई-मेलवर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रीय आपत्ती ठरू पाहणाºया कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. शिवाय आदेशाचा भंग करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही.कोरोना या विषाणू जन्य आजाराचा वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत प्रसार होऊ नये. शिवाय नेहमी गर्दी होणाºया ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात कुठल्याही नागरिकांला विनाकारण प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे.सुरक्षा रक्षक अन् कर्मचारी करताय नागरिकांचा गैरसमज दूरविविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमी नागरिक गर्दी करतात. याच इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय आहे. त्यामुळे कार्यालयीन दिवशी येथे नागरिकांची मोठी गर्दी राहते. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारावर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकासह कर्मचाºयांनी कार्यालयात काय म्हणून प्रवेश बंदी आहे. तुमचे कुठलेही काम असल्यास भिंतीवर चिटकविलेल्या सूचना फलकावरील अधिकाऱ्यांची थेट मोबाईलवर संपर्क साधा. शिवाय कुठलीही तक्रार असल्यास ई-मेलवर नोंदवा याची माहिती दिली. तर अनेक नागरिकांच्या तक्रारी आज स्विकारण्यात आल्या. असे असले तरी नागरिकांनी जमेतोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे. शिवाय नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. दक्षता म्हणून नागरिकांनी जिल्हाधिकरी, उपविभागीय महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयात येण्याचे टाळावे. कुठलीही तक्रार असल्यास वर्धाआरडीस, एसडीओवर्धा आणि आरओवर्धा या जीमेलच्या ुमेल आयडीवर तक्रार नोंदवावी.- प्रीती डुडुलकर, तहसीलदार, वर्धा.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस