कृषी प्रश्नांवर एकत्र येऊन कार्य करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:48 IST2017-09-18T00:48:07+5:302017-09-18T00:48:18+5:30
शेतकरी संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील जनता व शेतकºयांच्या समस्या जाणुन घेतल्या. चर्चा व संवादातून अडीअडचणी कशा सोडविता येईल. ग्रामीण भागाचे शोषण कसे थांबविता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

कृषी प्रश्नांवर एकत्र येऊन कार्य करण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शेतकरी संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील जनता व शेतकºयांच्या समस्या जाणुन घेतल्या. चर्चा व संवादातून अडीअडचणी कशा सोडविता येईल. ग्रामीण भागाचे शोषण कसे थांबविता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आमदार, खासदारांच्या पगारवाढीचा प्रश्न सुटतो पण शेतमालाच्या भाववाढीसाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून कृषी प्रश्नांवर कार्य करण्याची गरज आहे, असे मत भुमीपूत्र संघर्ष वाहिनीचे संस्थापक अभिजीत फाळके यांनी व्यक्त केले.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम येथे शेतकरी संवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संतोष अडसूड, प्रदीप बिन्नोळे, प्रदीप घोडे, प्रा. अरुण फाळके, मनोज भांगे उपस्थित होते. उपस्थितांनी समायोचित मार्गदर्शन केले. यानंतर शेतकºयांच्या समस्यांबाबत अभिजीत फाळके यांनी निवेदन स्विकारली. ९ सप्टेंबर ला सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथून यात्रेला प्रारंभ करण्यात आला होता.
आपुलकी सामाजिक संस्था पुणे, संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, अनिल गावंडे मित्र मंडळ, टिच वन, किसान पुत्र आंदोलन, मातृतिर्थ फाउंडेशन, सिंदखडेराजा व भूमीपूत्र संघर्ष वाहिनी या सामाजिक संघटनांच्या सहभागाने संवाद यात्रा काढण्यात आली होती.
प्रशांत देशमुख, सचिन घोडे, स्वप्नील देशमुख, रमेश घोगरे, योगेश घोगरे, अतुल पाळेकर, प्रवीण काटकर, प्रवीण उगेमुगे, अरुण काटकर, सागर बुराडे, गौरव देशमुख, मनोज चांदुरकर आदींनी सहकार्य केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.