शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

जीवित हानी टाळण्यासाठी हेल्मेट वापरणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:59 PM

गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४०० व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी एकानेही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देदत्तात्रय गुरव : २३ एप्रिलपासून सक्ती नव्हे, सुरक्षित प्रवासाच्या दिशेने पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४०० व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी एकानेही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे २३ एप्रिलपासून प्रत्येक दुचाकी चालकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.गुरव पुढे म्हणाले, ‘सडक सुरक्षा...जीवन की सुरक्षा’ या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून रस्ता सुरक्षा पंधरवाडा २३ एप्रिल पासून राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्याच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी सोमवारी सकाळी ७.३० वाजता शहरातून हेल्मेट बाबत जनजागृती करणारी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहे. सोमवार २३ रोजीपासून दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येकाला न्यायालयाच्या निर्देशानुसार हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य आहे. २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत प्रारंभी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हेल्मेटचा वापर न करताना आढळून आलेल्या व्यक्तींना सुचना पत्र देणार आहे. परंतु, सुचना पत्र देऊनही त्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर न केल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ७ मे पासून जो व्यक्ती हेल्मेटचा वापर न करताना आढळून येईल त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. २३ एप्रिलपासून हेल्मेट वापराबाबत वाहतूक नियंत्रण शाखा सक्ती नव्हे तर सुरक्षीत प्रवासाच्या दिशेने एक पाऊल टाकत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.शासकीय कार्यालयांशी पत्र व्यवहार१ एप्रिलपासून दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हेल्मेटचा वापर करावा या हेतूने पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात विविध शासकीय कार्यालयातील प्रमुखांशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे वकिलांनीही हेल्मेटचा वापर करावा या उद्देशाने न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार करण्यात आला असल्याचे गुरव यांनी सांगितले.