राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा

By Admin | Updated: June 19, 2016 01:53 IST2016-06-19T01:53:50+5:302016-06-19T01:53:50+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

NCP workers rally | राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा

राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा

प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती : कार्यकर्त्यांचा सत्कार
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रामाला माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
व्यासपीठावर माजी मंत्री अनिल देशमुख, आ. शशिकांत शिंदे, आ. ख्वाजा बेग, माजी आमदार सुरेश देशमुख व राजू तिमांडे, हिंगणघाट नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, वर्धा नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, किशोर माथनकर, राजेंद्र डागा, राम सातव, शंशाक घोडमारे, विजय मुळे, समीर देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी खा. पटेल म्हणाले, दोन वर्षाचा कालावधी लोटूनही शेतकरी, व सर्वसामान्य बागरिक सुखी नाहीत गृहिणीपासून तर विद्यार्थी अच्छे दिनच्या प्रतीक्षेतच आहेत. मोदी सरकार म्हणजे केवळ इव्हेन्ट मॅनेजमेंट असून ते सामान्यांचे नव्हे तर भांडवलदारांचे आहे असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचा मोठा गाजावाजा करण्यात आला. पण केलेली मदत किती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आणि ती किती तुटपुंजी आहे हे पाहणे आवश्यक असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान खा. प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने सुरेश देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे वर्धा जिल्हा पक्ष निरीक्षकपदी आ. शशिकांत शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. शरद देशमुख, समीर देशमुख, शशांक घोडमारे, अंबादास वानखेडे, शारदा केने, रमण लालवाणी आदींसह पार्टीच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी खा. पटेल यांचा सत्कार केला. संचालन लक्ष्मीनारायण सोनवणे तर आभार प्रा. खलील खतीब यंनी मानले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: NCP workers rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.