दिवाळी बोनस पिकावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:22+5:30
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. नियोजन क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात असलेले ढगाळ वातावरण आणि थांबून थांबून होणारा मुसळधार पाऊस याचा परिणामही उभ्या सोयाबीन पिकावर होत आहे.

दिवाळी बोनस पिकावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टीच
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख असून यंदा मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवडही जिल्ह्यातील शेतकºयांनी केली आहे. परंतु, सध्या याच पिकावर निसर्गाची वक्रदृष्टी असल्याचे दिसून येत आहे. पुढील आठ दिवस ढगाळी वातावरण बाजूला सारून ऊन पडली नाही तर सोयाबीनच्या शेंगा पाहिजे त्या प्रमाणात भरणार नाही. सध्या थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत असून अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेले सोयाबीन पीक शेतकऱ्यांना दगाच देणार आहे. शिवाय उताऱ्यात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. नियोजन क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात असलेले ढगाळ वातावरण आणि थांबून थांबून होणारा मुसळधार पाऊस याचा परिणामही उभ्या सोयाबीन पिकावर होत आहे. सेलू तालुक्यासह देवळी आणि आर्वी तालुक्यातील काही गावांमध्ये उंटअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
असे असले तरी सोयाबीन उत्पादकांना मार्गदर्शन करण्यापेक्षा कृषी विभागाचे अधिकारी कपाशी उत्पादकांना मार्गदर्शन करण्यावरच भर देत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे, सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही राजकीय पुढाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचेही वयोवृद्ध शेतकरी सांगतात. मागील वर्षी सोयाबीनचा एकरी पाच ते सहा पोत्याचा उतारा आला होता. पण यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे तीन ते चार पोती असाच उतारा येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकºयांकडून वर्तविला जात आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता कृषी विभागाने तातडीने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.
उघाड ठरेल नवसंजीवनी
जिल्ह्यातील ढगाळी वातावरण आणि थांबून थांबून होत असलेला मुसळधार पाऊस यामुळे सध्या सोयाबीनच्या शेंगा पाहिजे त्या प्रमाणात भरल्या नसल्याचे शेतकरी सांगतात. पुढील आठ दिवस ढगाळी वातावरण हटून जिल्ह्यात उघाड राहिल्यास सोयाबीन पिकाला नवसंजीवनीच मिळेल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात.
कार्यालयात बसून केले जातोय सर्वेक्षण?
कृषी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी सध्या कार्यालयात बसूनच सर्वेक्षणाचे काम पूर्ण करीत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.