शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

वर्ध्यातील एमगिरी परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारणार, नारायण राणे यांची घोषणा

By आनंद इंगोले | Updated: October 2, 2022 16:29 IST

Narayan Rane: महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्थेच्या परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारुन औद्यागिकीकरणाची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.

- आनंद इंगोलेवर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मोठे योगदान राहिले असून ग्रामीण स्वयंरोजगाच्या माध्यमातून आर्थिक संमृद्धीलाही चालना दिली. त्याचे हेच विचार घेवून वर्ध्यामध्ये ग्रामीण औद्योगिक प्रगतीचे लक्ष्य आहे. यासाठीच महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्थेच्या परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारुन औद्यागिकीकरणाची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.

महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) येथे आयोजित सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या स्मारक निर्मितीकरिता येत्या सहा महिन्यामध्ये समितीचे गठण करुन येत्या अडीच वर्षात या ३८ एकराच्या परिसरात स्मारक पूर्णत्वास जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून युवा पिढीला गांधींजींच्या ग्रामीण औाद्योगिक प्रगतीसंदर्भातील माहिती, प्रशिक्षण दिली जाईल. येथे येणाºया प्रत्येक पर्यटकांना एक वेगळी अनुभूती या स्मारकातून होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एमगिरीतील संचालकाचे पद रिक्त असून ऐत्या एक ते दीड महिन्यात हे पद भरले जाणार असून विदर्भातील व्यक्तीची नियुक्ती केली जाईल, असेही ना. राणे म्हणाले.  यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भानुप्रतापसिंह वर्मा, सूक्ष्म मंत्रालयाचे सचिव बी.बी.स्वैन, सहसचिन आणि अधिकारी आदी उपस्थित होते.

मातोश्रींवर खोके, शिवसैनिकांना खाली पिशव्या!बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते. बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं होत, तेव्हाच ते त्यांना मुख्यमंत्री करु शकले असते. केवळ मुख्यमंत्री पदासाठीच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावाने मते मागितली आणि गद्दारी करुन काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. आतापर्यंत मातोश्रीवर खोके जायचे आणि शिवसैनिकांना मात्र खाली पिशव्या मिळायच्या म्हणूनच शिवसेनेमध्ये ही फु ट पडली आहे. आता ठाकरेची शिवसेना ठासळण्याच्या स्थितीत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केली.

इतर पक्ष केवळ औषधाला ठेऊ!ठाकरेंच्या शिवसेनेला अस्तित्व राहिलं नाही. त्यांच्याकडे जे आमदार आहेत, तेही आता शिंंदे गटात दाखल होतील. काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेस आहे का? काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? काँग्रेसलाही मायबाप राहिलं नाही, त्यामुळे देशात फक्त एकच पक्ष राहणार तो म्हणजे भाजप. इतर पक्ष राहील पण, केवळ औषधापुरते, असेही राणे म्हणाले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Mahatma Gandhiमहात्मा गांधी