शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

तरोडाच्या ओसाड जमीनीला नेसविला हिरवा शालू, वर्षभ-यातच रोपट्यांनी गाठली सहा फुटाची उंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 18:29 IST

वृक्षारोपण व वृक्षसंवधनाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्ष लागवड उपक्रम गत वर्षापासून शासनाने हाती घेतला आहे. स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेसाठी स्थानिक वन विभागानेही कंबर कसली आहे.

वर्धा, दि. 11 - वृक्षारोपण व वृक्षसंवधनाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्ष लागवड उपक्रम गत वर्षापासून शासनाने हाती घेतला आहे. स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेसाठी स्थानिक वन विभागानेही कंबर कसली आहे. गत वर्षी तरोडा येथील ओसाड जमीनीची निवड करून तेथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लावण्यात आली होती. सदर वृक्षांची वेळोवेळी योग्य निगा घेण्यात आल्याने सध्या या रोपट्यांनी सहा फुटाच्यावर उंची गाठली असून एकूणच या उपक्रमामुळे तरोडाच्या ओसाड जमीनीला हिरवा शालू नेसविण्यात वर्धा वन विभागाला यश आल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

गत वर्षी वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने शासनाने दिलेल्या वृक्षारोपणाच्या उद्दिष्टपूर्तीकरिता खासदार दत्तक ग्राम असलेल्या मौजा तरोडा येथील सर्वे क्रमांक ११/२, ५६ या २४ हेक्टर ओसाड जमीनीची निवड केली. सदर ओसाड जमीनीवर गत वर्षी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी पुढाकार घेत श्रमदान करून तेथे मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींची एकूण २७ हजार ५०० रोपटी लावली. केवळ रोपटे लावून संबंधीत कर्मचारी व अधिकारी थांबले नाहीत तर त्यांनी लावलेल्या रोपट्यांची वेळोवेळी निगाही घेतली. परिणामी, सदर एक वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्यांनी सध्या सहा फुटाच्यावर उंची गाठली आहे.   पूर्वी हा भाग वृक्षाविना ओसाड होता. परंतु, वनविभागाच्या या उपक्रमामुळे सध्या हा परिसर हरितमय झाला आहे. यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याच परिसरात अधीक ५ हजार रोपटी लावण्यात आल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

अधिका-यांनी केली पाहणी...

मौजा तरोडा येथील ओसाड जमीनीला वनविभागाने हरितमय केले आहे. तेथील रोपट्यांची सध्याची स्थित, त्यांना वेळीच खत व पाणी दिल्या जाते काय याची पाहणी नुकतीच वन विभागाच्या अधिकाºयांनी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहाय्यक एस. आर. परटक्के, बीट रक्षक विलास पोहेकर आदींची उपस्थिती होती.

२७ हजार ५०० वृक्ष उत्तम स्थितीत...

मौजा तरोडा येथे गत वर्षी लावण्यात आलेली काही रोपटे विविध कारणांमुळे करपली तर काही रोपटी पुर्णत: वाळून गेल्याने त्यांच्या जागेवर यंदाच्या वर्षी नव्याने ५ हजार रोपटी लावण्यात आली आहे. सध्या हिरव्यागार झालेल्या तरोडा येथील या जमीनीवर साग, आवळा, बांबु, खैर, चिंच, पापडा, बेघड, कडुनिंब आदी प्रजातींची २७ हजार ५०० रोपटी उत्तम स्थितीत असल्याचे सांगण्यात आले.