खासदारांनी केली बोंडअळीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:58 IST2017-11-27T00:56:41+5:302017-11-27T00:58:13+5:30
आंजी परिसरात पवनूर, मांडवा, कामठी, नरसुला, पुलई, खैरी या गावांत बोंडअळीने कहर केला आहे. येथील शेतकारी या अळीमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत.

खासदारांनी केली बोंडअळीची पाहणी
ऑनलाईन लोकमत
आंजी (मोठी) : आंजी परिसरात पवनूर, मांडवा, कामठी, नरसुला, पुलई, खैरी या गावांत बोंडअळीने कहर केला आहे. येथील शेतकारी या अळीमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. याची माहिती मिळताच रविवारी खा. रामदास तडस, कृषी सभापती मुकेश भिसे, शिक्षण सभापती जयश्री गफाट, किसान सभेचे संजय इंगळे तिगावकर, मिलिंद भेंडे, सुनील गफाट, जगदीश संचेरिया, पं.स. सदस्य बावणे यांनी पाहणी केली.
यावेळी परिसरातील कामठी येथील सुभाष शिंदे, संजय हाडके, पवनूर येथील गजानन कडू, शरद कोंडलकर, माधव कारणकर, रमेश कारणकर, मांडवा येथील शरद पहाडे यांच्या शेताची पाहणी केली.