अंत्यसंस्काराकरिता दुचाकीने निघालेल्या झंझाळा येथील माय-लेकांना काळाने वाटेतच हिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST2021-03-12T05:00:00+5:302021-03-12T05:00:02+5:30

महिंद्रा बाबुराव महाजन-सरडे (३७) व प्रेमिला बाबुराव महाजन-सरडे (६०) दोघेही रा. झंझाळा तह. देवळी असे मृताचे नाव आहेत. तर नयना गजानन देवळे (१५) रा. इंझाळा ही गंभीर जखमी आहे. हे तिघेही एम.एच.३२ -३६१५ क्रमांकाच्या दुचाकीने झंझाळा येथून बोरगाव (हातला) येथे संत परमहंस परशराम बाबा यांच्या अंत्यदर्शनाकरिता जात होते. पिपरी पारगोठाण येथील प्रवासी निवाऱ्यासमोर मागाहून येणाऱ्या भरधाव ट्रकने महिंद्राच्या दुचाकीला जबर धडक दिली. 

Mother and son of Jhanjhala, which was set off by two-wheeler for the funeral, were lost on time. | अंत्यसंस्काराकरिता दुचाकीने निघालेल्या झंझाळा येथील माय-लेकांना काळाने वाटेतच हिरावले

अंत्यसंस्काराकरिता दुचाकीने निघालेल्या झंझाळा येथील माय-लेकांना काळाने वाटेतच हिरावले

ठळक मुद्देपिपरी पारगोठाणच्या प्रवासी निवाऱ्यासमोरील घटना: पंधरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी, ट्रक घटनास्थळावरुन दहेगाव(मुस्तफा) मार्गाने झाला पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी/पुलगाव : आर्वी तालुक्यातील बोरगाव (हातला) येथे दुचाकीने जात असलेल्या माय-लेकास भरधाव येणाऱ्या ट्रकने चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेली पंधरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात पुलगाव-आर्वी मार्गावरील पिपरी पारगोठाण येथील प्रवासी निवाऱ्यासमोर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडला.
महिंद्रा बाबुराव महाजन-सरडे (३७) व प्रेमिला बाबुराव महाजन-सरडे (६०) दोघेही रा. झंझाळा तह. देवळी असे मृताचे नाव आहेत. तर नयना गजानन देवळे (१५) रा. इंझाळा ही गंभीर जखमी आहे. हे तिघेही एम.एच.३२ -३६१५ क्रमांकाच्या दुचाकीने झंझाळा येथून बोरगाव (हातला) येथे संत परमहंस परशराम बाबा यांच्या अंत्यदर्शनाकरिता जात होते. पिपरी पारगोठाण येथील प्रवासी निवाऱ्यासमोर मागाहून येणाऱ्या भरधाव ट्रकने महिंद्राच्या दुचाकीला जबर धडक दिली. 
या अपघातात महिंद्रा व प्रेमिला हे माय-लेकं ट्रकमध्ये सापडल्याने त्यांना चिरडत नेले. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर नयना ही दूर फेकल्या गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर ट्रक चालकांने वाहनासह घटनास्थळावरुन पळ काढला. 
अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आर्वी पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बावणे, मनिष राठोड व राजू राऊत यांनी घटनास्थळ गाठून जखमी असलेल्या नयनाला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 
पंचनामा करुन दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातातील ट्रकचालक हा दहेगाव (मुस्तफा) मार्गे पसार झाल्याची माहिती गावकऱ्यांकडून प्राप्त झाल्याने     पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या अपघाताची आर्वी पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
घरातील कर्तबगार मुलासह आईचाही मृत्यू झाल्याने गावकरी हळहळले
पुलगाव नजीकच्या इंझाळा येथील रहिवासी असलेल्या महेंद्र बाबाराव महाजन-सरडे व त्याची आई प्रेमिला बाबाराव महाजन-सरडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता गावात पोहोचताच शोककळा पसरली. त्यांच्यासोबतची नयनाही जखमी असल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. महाजन-सरडे परिवार हा वारकरी संप्रदायाचा असून कष्टकरी आहेत. या विभक्त कुटूंब पद्धतीच्या काळातही महाजन-सरडे परिवार एकत्र कुटूंब पद्धतीत जीवन जगत होता. दोन भाऊ, स्नुषा, आई-वडील व नातवंड असा परिवार गुण्यागोविंदाने नांदत होता. महिंद्रा दिवसभर शेतात राबून भाजीपाला पिकविणे आणि पुलगाव बाजारात विकण्याचे काम करीत होता. त्यामुळे कुटूंबाची जबाबदारी पेलण्यात महिंद्राचा सिंहाचा वाटा होता. आज महाशिवरात्रीनिमित्त महिंद्राने गावातील मंदिरात दर्शन घेऊन बोरगाव (हातला) या गावाकडे रवाना झाला होता. पण, तेथे पोहोचण्यापूर्वीच अपघाताची बातमी धडकली. यात माय-लेकांचा जागीच मृत्यू झाल्याने परिवारावर मोठे संकट ओढवले आहे.

 

Web Title: Mother and son of Jhanjhala, which was set off by two-wheeler for the funeral, were lost on time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.