शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

सकाळीच वाढविला गावात, हिंगणघाटात बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

हिंगणघाटसह पीडितेच्या गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात पोहोचले. तेथील परिस्थितीची पाहणी केली. गावातील नागरिकांना पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तोपर्यंत नागपूर येथून पीडितेचे पार्थिव निघायचे होते.

ठळक मुद्देआक्रोश...संताप...

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल हल्ल्यातील पीडित तरुणीचा नागपूर येथील खासगी रूग्णालयात ६.५५ मिनिटांनी मृत्यू झाल्याची वार्ता कळताच वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने तत्काळ हिंगणघाटसह पीडितेच्या गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात पोहोचले. तेथील परिस्थितीची पाहणी केली. गावातील नागरिकांना पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तोपर्यंत नागपूर येथून पीडितेचे पार्थिव निघायचे होते.नागपूरवरून पीडितेचे पार्थिव दारोड्याकडे येण्यास निघताच हिंगणघाट व परिसरातील अनेक गावांतील नागरिक गावाकडे जाण्यास निघाले होते. हिंगणघाट शहरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मृतदेह गावात आणणार असल्याची माहिती मिळाल्याने समुद्रपूर, जाम आदी भागातील नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे होते.त्यानंतर पार्थिव घेऊन रूग्णवाहिका गावात दाखल झाली. तोपर्यंत गावातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने गजबजलेले होते. गावात प्रवेश होताच रूग्णवाहिकेवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती सांभाळली. त्यानंतर पीडितेचे पार्थिव तिच्या घरी नेण्यात आले.हिंगणघाट पोलिसांनी १०० जणांना केले स्थानबद्धहिंगणघाट : पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी येताच संतापाची लाट उसळली. हिंगणघाट शहरात शाळा, महाविद्यालयात मौन श्रद्धांजली वाहून सुटी देण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता १०० नागरिकांना हिंगणघाट पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते.जिल्हाधिकाऱ्यांनी केले शांततेचे आवाहनच्पीडितेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सकाळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. तसेच राज्यातील लोकांच्या संवेदना पीडितेच्या कुटुंबासोबत आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची नागरिकांची मागणी रास्त आहे. गृहमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबाशी संवाद साधला असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.हिंगणघाटमधील आठवडी बाजार परिसरात दिवसभर सामसूमच्घटनेच्या दिवशीपासूनच हिंगणघाट शहरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. आज पीडितेच्या मृत्यूनंतर त्यात आणखीच भर पडली. त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली होती. महामार्गावरील कलोडे चौक, पिंपळगाव चौक या ठिकाणी पोलीसदल सज्ज होते. शहरातील आठवडी बाजारात दररोज गर्दी असतात. मात्र आज सकाळपासूनच कमालीची शांतता होती. व्यावसायिकांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला. सायंकाळी अंत्यसंस्कारानंतर काही दुकाने उघडण्यात आली होती.