शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत युवक काँग्रेसचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: November 15, 2014 01:55 IST

आर्वी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आमदार अमर काळे यांच्या विधानसभा निलबंन कारवाईच्या पार्श्वभूमीवर शहरातून युवक काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

आर्वी : आर्वी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आमदार अमर काळे यांच्या विधानसभा निलबंन कारवाईच्या पार्श्वभूमीवर शहरातून युवक काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी सदर घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच निलंबन मागे घेण्यात यावे, या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी विलास ठाकरे यांना देण्यात आले. या निवेदनात, मुंबई येथे राज्यपालांना आपल्या मागण्यासंदर्भात व मतदानाने भाजपाने बहुमत सिद्ध न करता केलेल्या सत्ता स्थापनाचा निषेध नोंदविण्याकरिता गेलेल्या काँग्रेसच्या पाच आमदार निलबंनाची कारवाई करण्यात आली होती. कारवाई लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचा आरोप करण्यात आला. राज्यातील भाजपा सरकारने सरकार स्थापन करून बहुमत सिद्ध न करता पुरोगामी महाराष्ट्र सरकारात पहिल्यांदाच विश्वास मत आवाजी मतदानाने पारित झाले. वास्तविक विश्वासमत हे मतदान पद्धतीने घेण्याची परंपरा आहे. मात्र भाजपाने आपला पराभव जनतेपासून लपवून ठेवण्यासाठी आवाजी मतदान घेऊन विश्वासमत पारित करून घेतले. हे कृत्य सरकार राज्य घटनेच्या विरोधात असल्याचे युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनात नमुद केले आहे. या घटनेचा आर्वी युवक काँग्रेसने निषेध करून मूक मोर्चा काढला. यावेळी आर्वी पं.स. सभापती तारा ताडाम, जि.प. सदस्य गजानन गावंडे, न.प. सदस्य प्रा. पंकज वाघमारे, राजू रत्नपारखी, माणिक भादा, युवक काँग्रेसचे सचिन वैद्य, गौरव मोहोड, गजू शिंगणे, बाबाराव खोंडे, गजू गेडे, पंकज नायसे, रज्जाक अली, प्रवीण कडू, सचिन पाचोडे, प्रवीण पोटे, अमोल तेलतुमडे, किशोर सेलोकर, प्रशांत शिरपूरकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.(तालुका प्रतिनिधी)