शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून भीमनगरात थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST

आरोपी राजेश यादव व एका अल्पवयीन आरोपीने मृत आशीषचा भाऊ प्रणलचा मित्र विपुल तेलंग याच्या घराची साफसफाई करण्याचे काम घेतले होते. त्याकरिता विपुलकडून पाचशे रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊन तो आशीषकडे ठेवायला दिला होता.

ठळक मुद्देएकाची हत्या दोघे जखमी : अल्पवयीन युवकासह दोन्ही आरोपी फरार, पाचशे रुपयांसाठी घेतला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सावंगी मार्गालगतच्या भीमनगर परिसरात पाचशे रुपयांच्या वादातून एकाच परिवारातील बापलेकांवर चायनिज चाकूने हल्ला करण्यात आला. यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर बापलेक जखमी झाले आहे. हा थरार गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजतादरम्यान घडला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन आरोपीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघेही फ रार आहेत.आशीष अनिल भगत (२३) रा. भीमनगर असे मृताचे नाव आहे. तर त्याचे वडील अनिल कचरु भगत (४९) व भाऊ प्रणल अनिल भगत (२१) हे दोघेही जखमी झाले आहे. यातील आरोपी राजेश यादव व एका अल्पवयीन आरोपीने मृत आशीषचा भाऊ प्रणलचा मित्र विपुल तेलंग याच्या घराची साफसफाई करण्याचे काम घेतले होते. त्याकरिता विपुलकडून पाचशे रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊन तो आशीषकडे ठेवायला दिला होता. ठरल्याप्रमाणे आरोपींनी खोलीची साफसफाई केली नसल्यामुळे आशीषने पाचशे रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी आशीषसोबत वाद घालत चायनिज चाकूने पोटावर सपासप वार केले. यात आशीष गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. त्याला सोडविण्यासाठी धावलेले त्याचे वडील अनिल व लहान भाऊ प्रणल यांच्यावरही काठीने हल्ला चढविल्याने ते दोघेही जखमी झाले. याप्रकरणी मृताचे वडील अनिल भगत यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी राजेश यादव रा.भीमनगर व आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Murderखून