शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकाच्या मोबाईलने प्रवाशांना धोका

By admin | Updated: December 6, 2014 00:25 IST

सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या प्रवासाकडे पाहिले जाते. परंतू हल्लीच्या काळात एसटीचा प्रवास सोयीस्कर नाही असे अनेक अपघाताच्या घटनांवरुन दिसून येते. ..

तळेगाव (श्या.पं.) : सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या प्रवासाकडे पाहिले जाते. परंतू हल्लीच्या काळात एसटीचा प्रवास सोयीस्कर नाही असे अनेक अपघाताच्या घटनांवरुन दिसून येते. बसचालक वाहन चालवितांना चक्क मोबाईलचा वापर करीत असल्याचे चित्र अनेक बसगाड्यांमध्ये दिसून येते. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
वाहन चालविताना मोबाईल संभाषणावर बंदी असताना मोबाईलचा वापर केला जात आहे. धावत्या बसमध्येही मोबाईलचा वापर होत असल्याने प्रवाशांंना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. बसमधील चालक व वाहकांना प्रवासादरम्यान मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक बसेसमध्ये वाहक व चालक मोबाईलचा सर्रास वापर करतात. यामुळे एसटीला तोटाही होतो. शिवाय अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परिवहन मंडळाने ७ नोव्हेंबर २०१४ रोजी याबाबत आदेश काढून एसटीच्या चालक व वाहकांनी मोबाईल ठेऊ नये असे सांगितले. मात्र या मोबाईल बंदी आदेशाचा फज्जा जिल्ह्यातील एसटी वाहन चालक करीत आहेत. मोबाईलवर बोलता बोलता तोल ढासळला तर शेकडो प्रवाशांना प्राणास मुकावे लागेल. ही स्थिती एसटीच्या वाहन चालकांना माहिती असतानाही नियमाचा भंग केला जातो. चालक मोबाईलवर बोलून कारवाई करणाऱ्या पथकाची माहिती एकमेकांना देत असतात. त्यामुळे प्रवाशांकडून पैसे घेऊनही त्यांना तिकीट न देणाऱ्या वाहक व चालक यांना पकडता येत नाही. मोबाईल बंदीचे फर्मान सोडण्यात आले. मात्र याचे पालन वाहन चालक करीत नाही. एमएच. ४०-५३२३ या बसमधील चालक नागपूर वरून अमरावतीकडे येत असताना धावत्या बसमध्ये मोबाईलचा वापर करतो. त्यामुळे या बसमध्ये बसणारे प्रवासी काही वेळासाठी धास्तावले असता धावत्या बसमध्ये मोबाईलचा वापर करून बसमधील शेकडो प्रवाशांच्या जीवाशी तो एसटी चालक खेळत असल्याची तक्रार आहे.
आदेशात कारवाईची तरतूद नाही. एसटीचा चालक व वाहकांना मोबाईल बंदीचे आदेश देण्यात आले. परंतु वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणाऱ्या चालकांवर तसेच वाहकाकडे मोबाईल आढळल्यास कारवाई करण्यासंदर्भात परिवहन मंडळाने काहीच निर्णय दिला नाही. त्यामुळे चालक व वाहकांकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कसली कारवाई करावी असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडतो.(वार्ताहर)