शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

लाखो लिटर पाणी व्यर्थ

By admin | Updated: February 21, 2017 01:13 IST

उन्हाळ्याची चाहुल लागली असून उन्ह तापू लागले आहे. फेबु्रवारी महिन्यातच पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे.

सदोष व्हॉल्व्हचा परिणाम : बाजार समितीच्या आवारात साचला तलाववर्धा : उन्हाळ्याची चाहुल लागली असून उन्ह तापू लागले आहे. फेबु्रवारी महिन्यातच पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे. यामुळे उन्हाळ्यातील टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे; पण ही बाब प्रशासनालाच सांगावी लागत असल्याचे चित्र आहे. सदोष व्हॉल्व्हमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. हा प्रकार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडत असून पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. वर्धा शहराला धाम नदीवरून पाणी पुरवठा होतो. शहर अधिक अकरा गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत तर शहरातील काही भागाला नगर परिषदेमार्फत पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही यंत्रणांच्या पाणी पुरवठा योजनेमधील कामे सदोष असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पालिकेची शहरातील अनेक ठिकाणची पाईपलाईन वारंवार फुटते. परिणामी, पाण्याचा अपव्यय होतो. जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनच्या लिकेजचे प्रकारही वारंवार घडतात. गत काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचा व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला आहे. या ‘एअर व्हॉल्व्ह’मध्ये वारंवार बिघाड येत असल्याने लाखो लिटर पाणी दररोज वाहून जात आहे. या परिसरातील व्हॉल्व्हला सुरक्षिततेकरिता कुठलीही यंत्रणा नसल्याने त्या भागातील टार्गट मुले व नागरिक या व्हॉल्व्हची नासधूस करतात. पाणी भरण्यासह आंघोळ करणे, कपडे धुण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे तेथील उपस्थितांकडून सांगण्यात आले. नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)साचलेले पाणी, चिखलामुळे घाणीचे साम्राज्यकृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिंतीच्या आत असलेल्या या व्हॉल्व्हमध्ये वारंवार बिघाड येत असल्याने लाखो लिटर पाणी वाहून जाते. हे पाणी बाजार समितीच्या आवारामध्ये साचत असल्याने त्या भागाला तलावाचेच स्वरूप आले आहे. सतत पाणी साचत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वराहांचा मुक्तसंचार दिसून येतो. पाण्यामुळे गवत, झुडपे वाढली असून दुर्गंधी पसरली आहे. सतत पाणी साचत असल्याने संपूर्ण परिसर जलमय झाल्याचे दिसते. बाजार समिती प्रशासनही याकडे लक्ष देत नसल्याचेच दिसते.