दुधाच्या टँकरची कारला धडक

By Admin | Updated: February 3, 2016 02:09 IST2016-02-03T02:09:51+5:302016-02-03T02:09:51+5:30

नागपूरवरून वर्ध्याकडे येत असलेल्या कारला विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दुधाच्या टँकरने धडक दिली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला.

Milk tanker car hit | दुधाच्या टँकरची कारला धडक

दुधाच्या टँकरची कारला धडक

एक गंभीर : वर्धा-नागपूर मार्गावरील घटना
सेलू : नागपूरवरून वर्ध्याकडे येत असलेल्या कारला विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दुधाच्या टँकरने धडक दिली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजता कान्हापूर शिवारात घडली. जखमीचे नाव डॉ. चाम असे असून ते नागपूर येथील असल्याची माहिती घटनास्थळी मिळाली.
पोलीस सूत्रानुसार, डॉ. चाम हे एम.एच.३१ डीसी १२११ या कारने वर्धेकडे येत होते. वाहन ते स्वत: चालवीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान विरूद्ध दिशनेने येणाऱ्या जी.जे.०२ एक्स.एक्स ४५७७ या टँकर चालकाने कारला जबर धडक दिली. सदर टँकरमध्ये दूध भरून असल्याचे सांगण्यात आले. टायरल फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यात डॉ. चाम यांना वाहनातून दार तोडून उपस्थित लोकांनी बाहेर काढले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जखमीला उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Milk tanker car hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.