मिलन सुपर शॉपला आग; वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:26+5:30

शहर साखर झोपेत असताना अचानक महावीर भवनाजवळील मिलन सुपर शॉपला भीषण आग आगली. आगीचे लोळ उठताना पाहून शहराच एकच धावपळ उडाली. या आगीत सुपर शॉपच्या वरच्या माळ्यावर राहणाऱ्या मुथा परिवारातील वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर इतर परिवार थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी पहाटे साडेतीन वाजता दरम्यान घडली. या आगीत मिलन सुपर शॉपीतील किराणा व इतर साहित्याची राखरांगोळी होऊन कोट्यवधींच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे.

Milan Super Shop fire; Death of old age | मिलन सुपर शॉपला आग; वृद्धेचा मृत्यू

मिलन सुपर शॉपला आग; वृद्धेचा मृत्यू

ठळक मुद्देकोट्यवधींचे नुकसान : मुथा परिवारातील इतर सदस्य बचावले, हिंगणघाटमध्ये पहाटे उडाली खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहर साखर झोपेत असताना अचानक महावीर भवनाजवळील मिलन सुपर शॉपला भीषण आगआगली. आगीचे लोळ उठताना पाहून शहराच एकच धावपळ उडाली. या आगीत सुपर शॉपच्या वरच्या माळ्यावर राहणाऱ्या मुथा परिवारातील वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर इतर परिवार थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी पहाटे साडेतीन वाजता दरम्यान घडली. या आगीत मिलन सुपर शॉपीतील किराणा व इतर साहित्याची राखरांगोळी होऊन कोट्यवधींच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे.
शांताबाई मुथा (८०) असे मृत महिलेचे नाव आहे. हिंगणघाटातील विनायक चौधरी चौकामध्ये विजय मुथा व संजय मुथा या बंधुंच्या मालकीचे मिलन सुपर शॉप आहेत. त्याच्यावरच्या पहिल्या माळ्यावर निवासस्थान असून मुथा परिवारातील ९ सदस्यांचा निवास आहे. सोमवारी पहाटे सर्व परिवार गाढ झोपेत असताना सुपर शॉपीला अचानक आग लागली. या आगीच्या ज्वाळा पहिल्या पाळ्यापर्यंत पोहोचल्या. आगीच्या धुरामुळे जीव गुदमरू लागल्याने घरातील मंडळीला जाग आली. त्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच सर्व सदस्यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला परतु आगीने रौद्ररूप धारण केले होते. ही आग जिन्यापर्यंत येऊन पोहोचल्याने बाहेर पडण्याचा मार्गही बंद झाला होता. त्यामुळे विजय मुथा, त्यांची पत्नी व मुलांनी लागलीच बालकनी गाठून समोरील टिनाच्या शेडवर उडया घेत बाहेर पडले. तर संजय मुथा यांचा परिवार मागील बाजूने राहत असल्याने त्यांना जिन्याद्वारे बाहेर पडता आले नाही. तत्पूर्वी विजय मुथा यांनी वृद्ध आईला खोली बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भीषण आगीमुळे ते खोलीपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यात ते गंभीर जखमी झाले पण, आईला सुखरुप बाहेर काढण्यात त्यांना अपयश आले. या आगीत मुथा यांच्या सुपर शॉपमधील किराणा व इतर साहित्य जळाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले असून शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अन् यंत्रणेसह नागरिक आले धावून
आगीची माहिती विजय मुथा यांनी लगेच त्यांचे मित्र प्रदीप जोशी यांना दिल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यांना कळवून घटनास्थळी धाव घेतली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करुन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. आगीची माहिती वाºयासारखी शहरात पसरताच हजारो नागरिकांनी धाव घेतली. उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, तहसीलदार श्रीराम मुंधडा तसेच ठाणेदार सत्यवीर बंडीवार पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनाही माहिती दिली. त्यानंतर लगेच पुलगाव, नागपूर व वर्धा येथील अग्निशमन दलास पाचारण केल्यावर काही तासांची आग आटोक्यात आली. त्यांनी शांताबाई मुथा यांचा मृतदेह बाहेर काढला. तसेच दुकानातील सर्व साहित्य, रोख रक्कम, दागदागिने राख झाल्याने दोन कोटींच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला.
 

क्षणार्धात मुथा परिवाराचे सर्वस्व हरपले
हिंगणघाट येथे मुथा परिवाराचे अनेक वर्षांपासून किराणा दुकान आहे.पण, काळाच्या ओघात त्यांनी या दुकानाचे मिलन सुपर शॉपमध्ये रुपांतर केले. त्यांच्या या सुपर शॉपच्या आजूबाजूला दुकानांची रांग आहे. वेळीच आग आटोक्यात आल्याने इतर दुकानांचे नुकसान टळले. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले. संपूर्ण मुथा परिवार या घटनेने क्षणार्धात उघड्यावर आला आहे. या गंभीर घटनेने शहरातील नागरिक सुद्धा हादरुन गेलेत. मुथा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांचे सर्वस्व हरपल्यामुळे सदस्यांना अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे सर्व काही नव्याने उभारण्याचे आव्हान मुथा परिवारासमोर उभे ठाकले आहे. त्यांच्या मदतीकरिता समाजबांधव आणि हिंगणघाट येथील नागरिक सरसावले आहेत.

Web Title: Milan Super Shop fire; Death of old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग