इंग्रजीच्या बाजारीकरणात मराठी दुरावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:20+5:30
मायबोली मराठी भाषेला दुय्यम ठरवून इंग्रजी भाषेचे बाजारीकरण करणारा आपला समाज भारतीय संस्कृती पासून दुरावत चालेला आहे. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या या भाषेला आपणच गालबोट लावत असल्याची विदारक स्थिती आहे. त्यामुळे आपल्या भाषेचा सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत्येकांवर आली आहे, असे विचार डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी व्यक्त केले.

इंग्रजीच्या बाजारीकरणात मराठी दुरावली
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : मायबोली मराठी भाषेला दुय्यम ठरवून इंग्रजी भाषेचे बाजारीकरण करणारा आपला समाज भारतीय संस्कृती पासून दुरावत चालेला आहे. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या या भाषेला आपणच गालबोट लावत असल्याची विदारक स्थिती आहे. त्यामुळे आपल्या भाषेचा सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत्येकांवर आली आहे, असे विचार डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी व्यक्त केले.
स्थानिक श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. मिर्झा एक्सप्रेस तुफान विनोदी कार्यक्रमादरम्यान त्यांनी अनेक दाखले देऊन समाज प्रबोधन केले. विनोदी शैलीतून अनेक गमतीजमतीचे किस्से सांगून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षस्थानी अॅड. दिनेश शर्मा होते. अंधश्रध्देतून बुवाबाजीला चालना तसेच पती-पत्नीमध्ये गैरसमजातून होणारी भांडणे व त्याअनुषंगाने होत असलेले मनोरंजन यावर त्यांनी भाष्ट करून श्रोत्यांत हस्य पीकविला. सर्व धर्मांची शिकवण पररचराविषयी आदरभाव, प्रेम व व्यापक दृष्टीकोण ठेवणारी असल्याने प्रत्येकाने याचे अनुकरण करून समस्त समाजाचे उन्नतीसाठी झटले पाहिजे असे विचार डॉ. मिर्झा यांनी व्यक्त केले.
अॅड. शर्मा यांनी व्याख्यानमालेच्या विषयाचा आढावा घेऊन विचार व्यक्त केले. आयोजक मोहन अग्रवाल यांनी व्याख्यानमालेचा ३६ वर्षाचा प्रवास विषद करून श्यामसुंदर अग्रवाल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन दीपक सेठीया व आभार प्रदर्शन निता अग्रवाल यांनी केले.