शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण झोपेत; केली लोकांची झोप खराब !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 17:26 IST

उन्हामुळे लोड वाढले : विद्युत पोल वाकल्याने वीजतारा लोंबकळताहेत

लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी): जिल्ह्याचे तापमान पुन्हा एकदा तापायला लागले आहे. तापमान वाढले असताना महावितरणकडून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. रात्री बेरात्री केव्हा बत्ती गुल होईल याचा काही नेम नाही. वीज वाहून नेणाऱ्या बहुतांश वीजतारा लोंबकळत असल्याने थोडी जरी हवा सुटली तरी आपसात तारांचा स्पर्श होऊन फ्यूज जळतो. परिणामी वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांची रात्र खराब होत असल्याचे चित्र आहे. 

जून महिन्याचा आठवडा लोटला असूनही पारा तापलेलाच आहे. त्यामुळे आता सर्वच जण मान्सूनची प्रतीक्षा करत आहेत. महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली असली, तरी ग्रामीण व शहरी भागातील विजेचा लपंडाव मात्र सातत्याने सुरूच आहे. थोडाही वादळ, वारा, पाऊस आला की, वीज गायब होत आहे. असा कोणताही दिवस नाही की, त्यादिवशी वीज गेली नाही. त्यामुळे लोकांची झोपही खराब होत असून, शहरासह ग्रामीण भागातील नागरिक महावितरणच्या ढिसाळ कारभाराला वैतागले आहेत. नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत.

अधूनमधून वीज गायबदिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांना रात्रीतरी शांत झोप मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास झोपमोड होते. उष्मामुळे अंगाची लाहीलाही होते. झोपेमुळे हैराण झाल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा असते.

तक्रारी वाढल्याअचानक विजेचा दाब वाढल्याने संबंधित फिडरवरील ग्राहकांना फटका बसतो. विद्युत उपकरणे खराब होत आहेत. वादळी वाऱ्यामुळे खांब वाकत असून कुठे तर रोहित्र सुद्धा जमीनदोस्त होत आहे. दुपारच्या वेळेत वीजपुरवठा अचानक खंडित होऊन ग्राहकांची झोपमोड होते. तक्रारीसुद्धा वाढल्या आहेत.

वीज जाण्याची कारणे काय?• वीजवाहिनी तुटणे, रोहित्रातील बिघाड, वाहिन्या खराब होणे, वाऱ्यामुळे वीज तारांचे घर्षण, उपकेंद्रातील बॅटरी नादुरुस्त, रोहित्रातील तेल संपणे यासारख्या विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. सध्या तापमान वाढले आहे. मात्र, पावसाचा शिडकावा सुरू होण्याची लक्षणे दिसताच वीजपुरवठा खंडित केला जातो.•  पिन इन्स्युलेटर, डिस्क इन्सुलेटर उन्हामुळे तापलेले असल्याने पावसाचे • पाणी पडताच फुटण्याचा धोका असल्याने खबरदारी म्हणून महावितरणकडून वीजपुरवठाच बंद केला जातो. वाऱ्यामुळे वीजवाहिनी तुटण्याचे प्रकार आता वाढू लागले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी वेळ जातो. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केला जातो.• मान्सूनपूर्व कामाला महावितरणने गती। दिली आहे. ताराच्या बाजूचे झाडे तोडणे, धोकादायक वीज तार बदलवणे आदी काम करताना वीजपुरवठा खंडित करण्यात येत असतो.

सर्वच भागात हाल बेहालदिवसभरात अधूनमधून वीजपुरवठा गायब होत असल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होतो. वीजपुरवठा गायब होण्याची अनेक कारणे असली तरी तक्रारीही वाढल्या आहेत. याशिवाय सर्वच भागात हाल बेहाल आहेत. 

टॅग्स :electricityवीजSummer Specialसमर स्पेशलHeat Strokeउष्माघात