मगन संग्रहालयाचे सचिव डॉ. करुणाकरण यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 18:08 IST2019-03-12T18:07:36+5:302019-03-12T18:08:26+5:30
डॉ. करुणाकरण मगनवाडी परिसरातील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) येथे २०१०-२०१५ या काळात संचालक म्हणून कार्यरत होते.

मगन संग्रहालयाचे सचिव डॉ. करुणाकरण यांचे निधन
वर्धा - q समितीचे सचिव डॉ. टी. करुणाकरण यांचे ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. मंगळवारी मुंबईतच सकाळी १०.३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ७३ वर्षांचे होते.
डॉ. करुणाकरण मगनवाडी परिसरातील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) येथे २०१०-२०१५ या काळात संचालक म्हणून कार्यरत होते. येथील कार्यकाळ संपल्यानंतर मगन संग्रहालय समिती तसेच दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीचे सचिव म्हणून ते काम पाहत होते. त्यांनी मद्रास विद्यापीठातून इलेक्ट्रिकलमध्ये अभियांत्रिकीची तर आयआयटी दिल्ली येथून आचार्य पदवी प्राप्त केली. डॉ. करुणाकरण मध्य प्रदेशातील महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय तसेच गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठ, दिंडीगल येथे ते कुलगुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर तामिळनाडूतील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.