शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीआय’कडून कापूस उत्पादकांची लूट

By admin | Updated: November 8, 2014 22:41 IST

कापूस खरेदीची शासकीय यंत्रणा म्हणून शेतकरी सीसीआयकडे पाहत असताना केवळ कमी लांबीचा कापूस म्हणून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर देण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना

शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांचाच आधाररूपेश खैरी - वर्धा कापूस खरेदीची शासकीय यंत्रणा म्हणून शेतकरी सीसीआयकडे पाहत असताना केवळ कमी लांबीचा कापूस म्हणून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर देण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे अपेक्षित असताना त्यांच्याकडूनच लूट होत असल्याने आता कोणाकडे पहावे, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतातून घरी कापूस येणे सुरू झाले आहे. यंदा उत्पन्न कमी असल्याने आलेला कापूस बाजारात आणण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशात पनन महासंघाच्या खरेदीचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकणे सुरू केले आहे. शासकीय खरेदी सुरू झाली नसल्याने व्यापारी हमीभावाला किणार देत त्यांना वाटेल त्या दरात कापसाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. व्यापारी ३६०० ते ३८०० रुपयांचा दर देत आहेत. या दरात शेतकऱ्यांना कापूस विकणे न परवडणारा आहे. अशात सीसीआयची खरेदी सुरू झाली. जिल्ह्यात आजघडीला देवळी व पुलगाव येथे कापूस खरेदी सुरू आहे. यात पुलगावात अद्याप शुभारंभही झाला नाही. तर देवळीत सीसीआयने ३ हजार ९५० रुपये क्विंटलच्या दराने ३२९ क्विंटल कापसाची खरेदी केली. हा दर हमीभावापेक्षा शंभर रुपयाने कमी आहे. सीसीआयची खरेदी शासकीय असल्याने शेतकऱ्यांना हमीभाव देणे गरजेचे असताना केवळ कमी लांबीच्या नावावर शेतकऱ्यांनी लूट होत असल्याचे समोर येत आहे.