वर्धा येथील पत्रकार प्रशांत हेलोंडे यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 10:40 IST2018-06-30T10:39:39+5:302018-06-30T10:40:06+5:30

वर्धा येथील पत्रकार प्रशांत नारायण हेलोंडे यांचे शुक्रवारी मध्यरात्री मोटरसायकलवरून जात असताना झालेल्या अपघातात निधन झाले.

Lokmat's sub-editor of Wardha, Prashant Helondey, passes away | वर्धा येथील पत्रकार प्रशांत हेलोंडे यांचे अपघाती निधन

वर्धा येथील पत्रकार प्रशांत हेलोंडे यांचे अपघाती निधन

ठळक मुद्देसालस व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: वर्धा येथील पत्रकार  प्रशांत नारायण हेलोंडे यांचे शुक्रवारी मध्यरात्री मोटरसायकलवरून जात असताना झालेल्या अपघातात निधन झाले. ते वर्ध्याहून पुलगावकडे जात असताना दहेगावरजवळ हा अपघात घडला. ते ४१ वर्षांचे होते. अपघातानंतर त्यांना तात्काळ सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर पुलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.
आपल्या मनमिळावू व सालस स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. एक उमद्या व्यक्तिमत्त्वाचा पत्रकार म्हणून त्यांची वर्धा जिल्ह्यात ओळख होती. त्यांच्या निधनाने एक सच्चा मित्र गमावल्याची भावना सर्वांनाच जाणवत आहे.

Web Title: Lokmat's sub-editor of Wardha, Prashant Helondey, passes away