शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क कार्यालयाला ठोकले कुलूप

By admin | Updated: October 4, 2016 01:38 IST

दारूबंदी जिल्ह्यात येत असलेली दारू पकडण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन

जनवादी महिला संघटनेचे आंदोलन : कुलुपाची किल्ली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली वर्धा : दारूबंदी जिल्ह्यात येत असलेली दारू पकडण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात येत नाही. केवळ कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे म्हणत हा विभाग दारूविक्रेत्यांच्या पाठीशीच उभा राहतो. जर कारवाई करणे शक्य नसेल तर जिल्ह्यात या कार्यालयाची गरज काय, असे म्हणत अखिल भारतीय जनवादी महिला संटनेच्यावतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला सोमवारी कुलूप ठोकत त्याची किल्ली जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हवाली केली. जिल्ह्यात दारूबंदी आहे. अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस विभाग आहे. दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्याकरिता दोन विभाग असताना केवळ पोलिसांकडूनच दारू पकडण्यात येत आहे. दारू पकडण्याची ही कारवाई करताना पोलिसांकडून दारूविक्रेत्यांशी मोठ्याप्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यामुळे त्यांच्याकडून होत असलेली कारवाई नावालाच असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. दारूबंदीचा कायदा कडक करण्यात येत असला तरी जिल्ह्यात होत असलेल्या या दारूविक्रीवरून त्याचा काही उपयोग होत नसल्याचे समोर येत आहे. या संदर्भात शासनाला निवेदने दिली मात्र त्यावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. असे असतानाही दारू पकडण्याची विशेष जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्ह्यात दारू पकडण्याची कुठलीही कार्यवाही करण्यात येत नाही. या संदर्भात त्यांना विचारणा केली असता आमच्याकडे कर्मचारी संख्या नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. जर शासनाकडून या विभागाला कर्मचारी पुरविणे शक्य नाही, तर हा विभाग सुरू कशाला ठेवायचा असे म्हणत सोमवारी जनवादी महिला संघटनेच्यावतीने कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. कुलूप ठोकल्यानंतर या महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत कुलूपाच्या किल्ल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्या. यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्षा प्रभा घंगारे, जिल्हा अध्यक्षा प्रतिक्षा हाडके, जिल्हा सेक्रेटरी दुर्गा काकडे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी) संघटनेच्या निवेदनातील मागण्या ४जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्धेत होणारी अमरावती, नागपूर, यवतमाळ येथील आवक बंद करावी. ४यवतमाळ, नागपूर, अमरावती येथील परवानाधारक दारूविक्रेते व बारचे मालक वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी अवैधपणे दारू पुरवितात, त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांचे रेकॉर्ड, बीले, स्टॉक बुक वेळोवेळी तपासावे. परवानाधारक दारूविक्रेत्यावर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावे. ४राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, वर्धा यांना यासाठी दोन चारचाकी जीपगाड्या, पुरेसा कर्मचारी वर्ग त्वरीत पुरवावा. वर्धा येथील रिक्त जागा त्वरीत भरून अतिरिक्त कर्मचारी वर्ग मंजूर करावा आदी मागण्या करण्यात आल्या.