नालवाडीत कुलूपबंद घर टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:00 AM2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:13+5:30

प्राप्त माहितीनुसार, अशोक यादव हे अभियंता आहेत. ते दुबई येथे सेवा देत आहेत. असे असले तरी त्यांचा एक भाव आणि त्याचे कुटुंबीय तसेच अशोक यादव यांचे कुटुंबीय तिवारी ले-आऊट येथे वास्तव्यास आहेत. यादव कुटुंबीयांचे मुंबई येथील मुंबा देवीवर श्रद्धा आहे. अशोक यादव यांच्या लहान मुलाचे मुंडण करण्यासाठी यादव कुटुंबातील सर्वच सदस्य घराला कुलूप लावून २७ जानेवारीला सेवाग्राम एक्स्प्रेसने मुंबई येथे गेले होते.

Locked house target in Nalwadi | नालवाडीत कुलूपबंद घर टार्गेट

नालवाडीत कुलूपबंद घर टार्गेट

Next
ठळक मुद्देपरिसरात दहशत : ८.८१ लाखांचा मुद्देमाल पळविला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नालवाडी भागातील तिवारी ले-आऊट येथील अशोक श्रीकांत यादव यांच्या कुलूपबंद घराला चोरट्यांनी टार्गेट करून त्यांच्या घरातून रोखसह ८.८१ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सदर धाडसी चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरट्यांबाबतची कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अशोक यादव हे अभियंता आहेत. ते दुबई येथे सेवा देत आहेत. असे असले तरी त्यांचा एक भाव आणि त्याचे कुटुंबीय तसेच अशोक यादव यांचे कुटुंबीय तिवारी ले-आऊट येथे वास्तव्यास आहेत. यादव कुटुंबीयांचे मुंबई येथील मुंबा देवीवर श्रद्धा आहे. अशोक यादव यांच्या लहान मुलाचे मुंडण करण्यासाठी यादव कुटुंबातील सर्वच सदस्य घराला कुलूप लावून २७ जानेवारीला सेवाग्राम एक्स्प्रेसने मुंबई येथे गेले होते. रविवारी सकाळी ते वर्धेत परल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांच्या चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चोरट्यांनी यादव यांच्या घरातून दोन लाख किंमतीचा सात तोळे वजनाचा सोन्याचा कंठीहार, दोन लाख किंमतीचा राणीहार, ७५ हजार रुपये किंमतीचे बाजूबंद, दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र, सोन्याच्या पाच अंगठ्या, दीड तोळ्याची सोनसाखळी, एक तोळा वजनाचे कानातले झुमके, दीड तोळे वजनाचे कानातले रिंग, १४ ग्रॅम वजनाची नाकातील रिंग, आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १५ ग्रॅम वजनाच्या दोन सोनसाखळ्या, दोन हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या वाट्या, रोख ४९ हजार रुपये आणि एम.एच.३२ झेड. ५९२५ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ८ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अशोक यादव यांच्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकाकडून पाहणी
धाडसी चोरीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठले. शिवाय ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळी पोहोचलेल्या या दोन्ही पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली; पण चोरटे नेमके कोण याचा ठोस सुगावा त्यांच्या हाती लागला नसल्याचे सांगण्यात आले. लवकरच चोरट्यांना जेरबंद करू असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
 

Web Title: Locked house target in Nalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर