शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन; २२ लाख प्रशासनाच्या लॉकरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट या तिन्ही उपविभागात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणामध्ये ३६ पथके तयार करण्यात आली आहे. या सर्व पथकांनी आपापल्या उपविभागीती ३०३ गावांना भेटी देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हात कोरोनाला प्रवेश मिळू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तिन्ही उपविभागातील ३४ गर्दीचे ठिकाणे शोधून काढली आहे.

ठळक मुद्देसंचारबंदंी काळात दंडात्मक कारवाई : वर्धा उपविभागाचा सर्वाधिक वाटा

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांना घरातच रहा, विनाकारण रस्त्यावर फिरु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, अशा सूचना दिल्यानंतरही काही बेफिकीर नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशांवर प्रशासनाकडून जिल्ह्याभरात कारवाईचा बडगा उगारुन या लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत तब्बल २२ लाख ५० हजार २२९ रुपयांचा दंड वसूल केला आहे.जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट या तिन्ही उपविभागात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणामध्ये ३६ पथके तयार करण्यात आली आहे. या सर्व पथकांनी आपापल्या उपविभागीती ३०३ गावांना भेटी देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हात कोरोनाला प्रवेश मिळू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तिन्ही उपविभागातील ३४ गर्दीचे ठिकाणे शोधून काढली आहे. त्या ठिकाणची गर्दी टाळून तेथे सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी व्हावी याकरिता वर्ग १ व २ संवर्गातील अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या शासकीय अधिकाऱ्यांना विविध स्वयंसेवी संस्थांचीही मदत मिळत आहे. नियंत्रण अधिकाऱ्यांसोबत ९० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी दिवसरात्र कार्य करीत आहे.नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सुरु ठेवण्यात आली आहे. तरीही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहे. त्यांच्यावर नाईलाजास्तव प्रशासनाला दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. मास्क न वापरणे, विनाकारण बाहेर फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे, याप्रकरणी कारवाई करीत आतापर्यंत २२ लाख ५० हजार २२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक दंड १८ लाख ४८ हजार ७०० रुपये हा फक्त वर्धा उपविभागात वसूल केला आहे.्र यासर्व उपाययोजनांमुळेच वर्ध्यात कोरोनाला अद्याप एंट्री मिळाली नाही.झोपडपट्ट्यांची संख्या वर्ध्यात अधिकजिल्हयातील वर्धा उपविभागात उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, आर्वी उपविभागात उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक तर हिंगणघाट उपविभागात उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या नेतृत्वात कोरोनाशी लढा सुरु आहे. तिन्ही उपविभागामध्ये असलेल्या झोपडपट्ट्यांचीही नोंद घेतली असून तेथेही प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या जात आहे. जिल्ह्यात ४८ झोपडपट्टया असून सर्वाधित ३० झोपडपट्टया वर्धा उपविभागात आहे. त्यातील १४ झोपडपट्टया एक ट्या वर्धा शहरामध्ये आहे. या परिसरावर प्रशासनाची करडी नजर आहे. आरोग्य विभागाकडून वारंवार तपासणी करण्यासोबतच इतरही खबरदारी घेतली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार