लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत फायनाशिअल इंक्लूजन लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी १४५ सदस्यांकडून वसूल केलेले कर्जाचे हप्ते कंपनीत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरत कंपनीची २० लाख ७६ हजार ८०१ रुपयांची फसवणूक केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.
याप्रकरणी बीएफआयएल बॅच मॅनेजर इरफान खान बशीर खान (३५, रा. पिपळखुटा, ता. मोर्शी, जि. अमरावती. ह.मु रामनगर चांदूर रेल्वे) यांनी आर्वी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सागर अशोकराव देशमुख (२९, रा. शिररखेड ता. मोर्शी, जि. अमरावती), दर्शना रामदास खाजोने (२१, रा. आष्टी, जि. वर्धा), मनोज बंडूजी निंबुळकर (२९, रा. मोहदी, धोत्रा, जि. नागपूर), अजय सुखदेव उईके (रा. दळवी मोहदी, जि. नागपूर) व अमीर खान हमीद खान (२४, रा. शेंदुरजनाघाट, जि. अमरावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारकर्ता हे ९ सप्टेंबर २०२३ पासून १३ एप्रिल २०२५ पर्यंत आर्वी येथील शाखेत ब्रँच मॅनेजर पदावर कार्यरत होते. याच कार्यकाळात आरोपी हे कंपनीमध्ये संघम मॅनेजर म्हणून काम करीत होते. यामधील आरोपी सागर देशमुख यांनी साधारणतः ८ जुलै ते ८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १२ सदस्यांकडून लोन प्रीक्लोज रक्कम १ लाख ५६ हजार ४०५ रुपये घेतले व आर्वी येथील ऑफिसमध्ये भरले नाही. तसेच दर्शना खाजोने याने साधारणतः ५ जुलै ते १२ जुलै २०२४ पर्यंत एकूण १६ सदस्यांकडून १ लाख १३ हजार ३९०, मनोज निंबुलकर यांनी ७ मे ते १९ जुलै २०२४ या कालवधीमध्ये ५२ सदस्यांकडून १० लाख ८५ हजार ९२९ रुपये, तर अजय उईके यांनी २१ जून ते २७ जून २०२४ एकूण ४६ सदस्यांची ६ लाख ५६ हजार ८९७ रुपये तर अमीर खान हमीद खान याने २५ ऑक्टोबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ पर्यंत १९ सदस्यांकडून लोनचे प्रीक्लोजचे ६४ हजार १८० रुपये या सर्व आरोपीने एकूण १४५ सदस्यांकडून २० लाख ७६ हजार ८०१ रुपये वसूल केले मात्र, ते कंपनीमध्ये जमा केलेच नाही.
Web Summary : Five employees of Bharat Financial Inclusion Limited in Arvi embezzled ₹20.76 lakh. They collected loan installments from 145 members between July 2024 and January 2025 but did not deposit the money into the company account, according to a police complaint.
Web Summary : आर्वी में भारत फाइनेंशियल इंक्लूजन लिमिटेड के पांच कर्मचारियों ने ₹20.76 लाख का गबन किया। उन्होंने जुलाई 2024 और जनवरी 2025 के बीच 145 सदस्यों से ऋण किश्तें एकत्र कीं, लेकिन पुलिस शिकायत के अनुसार, कंपनी के खाते में पैसा जमा नहीं किया।