नवजीवन एक्स्प्रेसमधून दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:35 PM2018-08-10T23:35:23+5:302018-08-10T23:36:21+5:30

नवजीवन एक्स्प्रेसमधील अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ९ आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ३८ हजार ९० रूपयाचा दारूसाठा जप्त केला. जळगाव येथील दोन इसमाजवळील ९ बॅगमधून ही दारू जप्त करण्यात आली.

Liquor seized from Navajivan Express | नवजीवन एक्स्प्रेसमधून दारू जप्त

नवजीवन एक्स्प्रेसमधून दारू जप्त

Next
ठळक मुद्देजळगावच्या दोघांना अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नवजीवन एक्स्प्रेसमधील अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ९ आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ३८ हजार ९० रूपयाचा दारूसाठा जप्त केला. जळगाव येथील दोन इसमाजवळील ९ बॅगमधून ही दारू जप्त करण्यात आली.
रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सुरेश कांबळे यांना नवजीवन एक्स्प्रेसमधून दोन व्यक्ती एस ४ व एस ७ या कोचमधून दारू आणत आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर वर्धा-हिंगणघाट रेल्वे स्थानकादरम्यान दोन व्यक्तींची सेवेवर तैनात असलेले पोलीस हवालदार गजानन आगमने, अनिकेत धांडे, विकास बोरवर, निलेश मोरे यांनी चौकशी केली. जळगाव येथील रहिवासी असलेले किरण फुलसिंग जाधव (२५) व राज सुरेश भाट (२२) यांच्याजवळ असलेल्या ९ बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात १ हजार ४६५ देशी दारूच्या ३८ हजार ९० रूपयाच्या बॉटल आढळून आल्या. या दोघांवरही रेल्वे पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर दारू त्यांनी कुठून आणली होती, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. वर्धा, चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, मात्र रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दारूची चोरटी वाहतूक केली जाते.
गावठी दारूचा १ लाख ६० हजार रूपयांचा साठा केला नष्ट
तळेगांव (शा.पं.) - तळेगांव पोलीसांनी जामनेर शिवारातील मन्नत बुवा टेकडी परिसरात शुक्रवार छापा टाकून १८ ड्रम मधील ३ हजार लीटर मोहा, सडवा असा एकूण १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. सदर कारवाई ठाणेदार रविकुमार राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. दारु गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त केले आहे. अज्ञात दारु विकेत्यांविरूद्ध तळेगांव पोलीसात दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उप निरिक्षक प्रदीप राठोड, नायब पोलीस शिपाई निलेश पेटकर, परवेज खान, सचिन साठे, पोलीस हवालदार आशिष चव्हाण, अमोल मानमोडे, सिध्दार्थ टोकसे, शेख हकिम, रुपेश उगेमुगे आदींनी केली.
३ लाख ११ हजार रूपयांचा माल जप्त
आर्वी- कवाडी (तांडा) ते गव्हाणखेडी मार्गावर नाकाबंदी करून एका पांढºया रंगाच्या वाहनातून पोलिसांनी गावठी मोह दारू भरलेले दोन ट्युबची वाहतुक करताना अनिल लक्ष्मण राठोड (२८) याला अटक केली. सदर प्रकरणात दारूसह वाहन असा ३ लाख ११ हजार २०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आर्वी पोलिसांनी ही कारवाई पार पाडली.

Web Title: Liquor seized from Navajivan Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.