शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीच्या विविध बॅँकांतील लिंक फेल

By admin | Updated: September 3, 2015 01:54 IST

बॅँकांचे संगणकीकरण करण्यात आले. त्यामुळे विविध कामे लिंक असल्याशिवाय होत नाही.

वर्धा : बॅँकांचे संगणकीकरण करण्यात आले. त्यामुळे विविध कामे लिंक असल्याशिवाय होत नाही. आर्वी शहरात दोन दिवसांपासून बॅँकांतील लिंक फेल असल्याने विविध बॅँकांतील कामांचा खोळंबा झाला आहे. त्याचा परिणाम ग्राहकांसह शेतकऱ्यांवरही होत आहे. बॅँकांच्या संगणकीकरणानंतर विविध कामे चुटकीसरशी होतील, अशी सर्वसामान्य ग्राहकांना अपेक्षा होती. त्यासाठी बॅँकांचे व्यवहार इंटरनेटशी जोडण्यात आले. पण, इंटरनेटचा वेग आणि बरेचदा त्यामधून निर्माण होणाऱ्या अडचणी बॅँकांसाठी डोकेदुखीच्या ठरू लागल्या आहेत. इंटरनेटला वेगच राहत नसल्याने बॅँकांमध्ये एका कामासाठी कित्येक वेळ प्रतीक्षा करावी लागते. शिवाय लिंक फेल असल्यास कामांचा खोळंबा होतो. लिंक फेल असल्यास ग्राहकांना आजचे काम उद्या करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. आर्वी शहरातील विविध बॅँकांमध्ये सोमवारपासून ही अडचण निर्माण झाल्याचे समजते. कार्यालयातील लिंक फेल असल्याने ग्राहकांसोबतच शेतकऱ्यांच्याही कामांचा खोळंबा झाला आहे. लिंक अभावी चालान भरू शकत नसल्याने कामे थांबली आहेत. दोन दिवसांपासून लिंक फेल असताना संबंधित मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. शेतकऱ्यांची कामे खोळंबू लागल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना विविध कारणांसाठी बॅँकांमध्ये जावे लागते. लिंक फेल असल्यास शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागते.(तालुका प्रतिनिधी)