Life imprisonment for abusing a minor girl | अल्ववयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास आजन्म कारावास

अल्ववयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास आजन्म कारावास

ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिशांचा निर्वाळातीन लाखांच्या नुकसान भरपाईचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: घरासमोर खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारवास, २ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच शासनाकडून पिडितेला ३ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. हा निर्वाळा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ मृदुला भाटीया यांनी दिला.
सुरेश गोंविद मुनेश्वर (२५) रा. बरबडी असे आरोपीचे नाव आहे. पिडित चिमुकली मुलींसोबत घरासमोर खेळत होती. खेळून घरी परतल्यानंतर तिच्या कपड्यावर रक्ताचे डाग दिसून आल्याने घरच्यांना चांगलाच धक्का बसला. याबद्दल तिला विश्वासात विचारणा केली असता पिडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन चिमुक लीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर डॉक्टरांनी लैंगिक गैरप्रकार झाल्याचे सांगितले. सेवाग्रामचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकूर यांनी याप्रकरणाचा सखोल तपास करुन पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीला अटक केली. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.शासनाव्दारे ११ साक्षिदार तपासण्यात आले. शासकीय अभियोक्ता जी.व्ही.तकवाले यांचा युक्तिवाद ऐक ल्यानंतर जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ मृदुला भाटीया यांनी आरोपी सुरेश मुनेश्वर याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार गांजरे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Web Title: Life imprisonment for abusing a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.