कारंजा तहसील कार्यालयाला गळती
By Admin | Updated: September 11, 2014 23:45 IST2014-09-11T23:45:59+5:302014-09-11T23:45:59+5:30
तब्बल एक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीचे अखेर लोकार्पण झाले. तालुक्याचे मुख्य कार्यालय म्हणुन तहसीलकडे पाहिले जाते. मात्र या नवीन इमारतीला सततधार

कारंजा तहसील कार्यालयाला गळती
कारंजा(घा.) : तब्बल एक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीचे अखेर लोकार्पण झाले. तालुक्याचे मुख्य कार्यालय म्हणुन तहसीलकडे पाहिले जाते. मात्र या नवीन इमारतीला सततधार पावसामुळे गळती लागली आहे. याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या इमारतीचा लोकार्पणापुर्वी ताबा तहसीलदार बालपांडे यांनी घेतला तेव्हा इमारतीला गळती सुरु झाली होती. या इमारतीच्या छताला जागोजागी गळती लागली आहे. शिवात भिंतील ओल आले आहे. तीन लक्ष रुपये किमतीचा दरवाजा बसविलेला निवडणुक कक्ष असो वा प्रवेशव्दार. पोर्च, सभागृह येथेही पावसाचे पाणी टपकते. एकंदरीत या ईमारतीचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याची चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी नागरिकातून होत आहे.
तालुक्यातील अन्य शासकीय बांधकामे ही दर्जाची होत नसल्याची नागरीकांत चर्चा आहे. त्याचेच हे ज्वलंत उदाहरण म्हणजे तहसील कार्यालयाची ईमारत आहे.
या ईमारतीत येणारे यापेक्षा जुनीच ईमारत बरी होती असे म्हणतात. दोनदा थाटात लोकार्पन झालेल्या इमारतीच्या बांधकामाव्ह्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे. दोन कोटी रुपये खर्च करुन सुध्दा ईमारतीचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याने सदर काम हे कंत्राटदाराकडुन विनामुल्य करुन घेण्याची मागणी होत आहे. याबाबत १५ आॅगस्टला येथील तहसीलदार बालपांडे यांना नागरिकांनी विचारणा केली असता त्यांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसावर आहे. तहसील कार्यालयातील निवडणुक कक्षात टपटप पाणी गळते. अशावेळेस निवडणुक सामग्री येथे सुरक्षित राहील काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देत योग्य कारवाईची मागणी आहे. कारवाईकडे नागरिकांचे लक्ष आहे.(शहर प्रतिनिधी)