शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी महिला मंडळ सदस्य सन्मानित

By admin | Updated: November 15, 2014 02:00 IST

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, वर्धा जिल्हा आणि मैत्री साधना प्रतिष्ठान यांच्या द्वारे आयोजित दारूबंदी महिला मंडळ सन्मान सोहळयाचे आयोजन वर्धा शहरानजिकच्या ...

वर्धा : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, वर्धा जिल्हा आणि मैत्री साधना प्रतिष्ठान यांच्या द्वारे आयोजित दारूबंदी महिला मंडळ सन्मान सोहळयाचे आयोजन वर्धा शहरानजिकच्या साटोडा या गावी करण्यात आले होते. जिल्ह्यात दारूबंदी असून कारला, आलोडी, नालवाडी, साटोडा गावांमध्ये दारुच्या निर्मितीला जोर आला होता. गावातील अनेक पुरुष मंडळी व्यवसाने अधीन झाली होती. यामुळे व्यक्तींच्या मानसिक, शारिरीक अवस्थांसहित त्याची आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक संबंधावर विपरित परिणाम होत होता. या परिस्थितीचा आढावा घेत ज्ञानेश्वर येवतकर यांनी पुढाकार घेऊन या गावामधील महिला दारूबंदी मंडळ व ग्रामसंरक्षण दलाची स्थापना करून युवा व महिलांचा पुढाकार घेऊन या गावामधील दारूबंदी महिला मंडळ व ग्रामसंरक्षण दलाची स्थापना करून युवा व महिलांचा पुढाकार घेऊन दारू निर्मितीला पूर्णत: आळा घातला. सतत प्रबोधन, जनजागृती व विनंती करुन त्यांनी लोकांना दारू निर्मीतीचा व्यवसाय सोडावयास भाग पाडले. तसेच दारुच्या अधीन झालेल्या अनेक ग्रामस्थांनी स्वेच्छेने दारू सोडली व महिलांच्या अभियानाला सहयोग दिला. अशा युवा व महिलांच्या कार्याची दखल घेऊन ज्ञानेश्वर येवतकर यांनी पुढाकार घेऊन या महिला व युवा कार्यकर्त्यांना सन्मान सोहळा घडवून आणला. या सम्मान सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपअधीक्षक संतोष वानखेडे, अध्यक्षस्थानी रघुनाथ शाहू तर प्रमुख अतिथी म्हणून सेवाग्राम पोलीस ठाणेदार पराग पोटे, मोरे महाराज, किशोर निलियम, पवन शाहू यासोबत पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना उपअधीक्षक संतोष वानखेडे म्हणाले, वर्धा जिल्ह्यात दारू विक्रीला उधाण आले आहे. मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. यावर बंदी आणण्यासाठी आमचे पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहे. आम्हाला दारू आणि व्यसनमुक्तीसाठी गावाच्या सहकार्याची गरज आहे. वर्धा जिल्ह्यातील गावातील महिला मंडळ व ग्राम संरक्षण दलांनी पुढे आल्यास पोलीस प्रशासन त्यांना मदत करायला तयार आहे असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर येवतकर यांनी केले. यशस्वीतेकरिता नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य, मैत्री साधना प्रतिष्ठाण, जय महाकाली दारूबंदी महिला मंडळ, साटोडा, समानता दारूबंदी महिला मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ, महिला दारूबंदी मंडळ, आलोडी, सोटोडा कारला तसेच साटोडा गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती. दारूबंदीसाठी गावातील नागरिक सर्वतोपरी या कामासाठी सहकार्य करतील, असे मत नागरिकांनी यावेळी व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)