शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यावसायिकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST

विलास गोविंद करंडे (५६) रा. सराफा लाईन यांचे सराफा बाजारपेठेत दागिन्यांचे दुकान आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास सुरज बंडू पाटील रा. दयालनगर याला दुकानासमोर लावलेली हातगाडी हटविण्यास सांगितले. सुरज पाटील याने वाद करीत हातगाडी हटविण्यास नकार देत विलास करंडे यांच्याशी वाद घातला. दरम्यान याबाबतची तक्रार विलास करंडे यांनी पोलिसात दिली.

ठळक मुद्देदोन आरोपींना अटक : हल्ल्याच्या निषेधार्थ सराफा प्रतिष्ठाने बंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दुकानासमोरील हातगाडी काढण्यास सांगितले असता हातगाडीचालकाने सराफा व्यावसायिकावर चाकूहल्ला केला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.विलास गोविंद करंडे (५६) रा. सराफा लाईन यांचे सराफा बाजारपेठेत दागिन्यांचे दुकान आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास सुरज बंडू पाटील रा. दयालनगर याला दुकानासमोर लावलेली हातगाडी हटविण्यास सांगितले. सुरज पाटील याने वाद करीत हातगाडी हटविण्यास नकार देत विलास करंडे यांच्याशी वाद घातला. दरम्यान याबाबतची तक्रार विलास करंडे यांनी पोलिसात दिली. पोलिसात तक्रार का दिली या कारणावरुन पुन्हा वाद करीत सुरज पाटील आणि वैभव पाटील यांनी विलास करंडे त्यांच्यावर चाकूहल्ला केला. यात विलास करंडे यांच्या हाताला जखम झाली. पोलिसांनी सुरज पाटील आणि वैभव पाटील यांना अटक केली.सराफा ओळीला पोलीस छावणीचे स्वरूपसराफा व्यावसायिक विलास करंडे यांचा हातगाडीचालक सुरज पाटील याच्याशी वाद झाल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी गोल बाजार चौकातील सर्व फेरीवाल्यांना हुसकावून लावले. रात्री ९ वाजेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. पण, पोलीस जाताच विलास करंडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ दुपारपर्यंत प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर यांनी सराफ लाईनमध्ये जाऊन पाहणी केली असता येथील हातगाडीचालकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी विलास करंडे, शालिग्राम टिबडीवाल, प्रवीण हिवरे, वैभव घडे, देविदास करंडे यांनी केली.पाच हातगाडीचालकांवर कारवाईपोलिसांनी गोलबाजार परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या शेख सलीम शेख कादर रा. पुलफैल, सुरज अविनाश पाटील रा. दयाल नगर, विनोद मारोतराव वानखेडे रा. सेवाग्राम, देविदास पाटील रा. पुलफैल आणि कमलेश चकोले रा. रामनगर या पाच हातगाडीचालकांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले.