गळ्यावर चाकूचे वार युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 05:00 AM2021-07-29T05:00:00+5:302021-07-29T05:00:37+5:30

बुधवारी सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. किसन गजानन देवतळे (१८, रा. आनंदनगर) असे मृतकाचे नाव आहे.  किसन देवतळे याला अज्ञात मारेकऱ्यांनी आनंदनगर येथून दुचाकीने चितोडा परिसरात असलेल्या पाॅवर हाऊसच्या मागील मोकळ्या मैदानात बोलाविले.

Killing a youth with a knife to the neck | गळ्यावर चाकूचे वार युवकाची हत्या

गळ्यावर चाकूचे वार युवकाची हत्या

Next
ठळक मुद्देचितोडा परिसरातील घटना : अज्ञातांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अज्ञात मारेकऱ्यांनी युवकाची हत्या करून मृतदेह चितोडा रस्त्यावरील पाॅवर हाऊसच्या मागील मोकळ्या जागेवर आणून फेकला. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 
बुधवारी सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. किसन गजानन देवतळे (१८, रा. आनंदनगर) असे मृतकाचे नाव आहे. 
किसन देवतळे याला अज्ञात मारेकऱ्यांनी आनंदनगर येथून दुचाकीने चितोडा परिसरात असलेल्या पाॅवर हाऊसच्या मागील मोकळ्या मैदानात बोलाविले. दरम्यान, त्याच्याशी वाद करून त्याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. इतकेच नव्हे तर किसनच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार करीत त्याची हत्या करून मृतदेह तेथेच फेकून दिला, असा संशय आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास रक्तबंबाळ स्थितीत मृतदेह नागरिकांना दिसताच त्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडिवार यांच्यासह वर्धा शहर गुन्हे शोध पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ, श्वानपथकालादेखील पाचारण करण्यात आले होते. 

दोन आरोपींना एलसीबीने घेतले ताब्यात
खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची टीम आरोपींच्या शोधात रवाना झाली होती. रात्री उशीरा या खुन प्रकरणातील दोन आरोपींना एलसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

 

Web Title: Killing a youth with a knife to the neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app