शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून वृद्धाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

रामभाऊ किसन नेवारे (६२) रा. जामठा, जि. नागपूर असे मृताचे नाव आहे. हे दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आज सकाळी आजनगाव-बोंदुर्णी रस्त्यालगतच्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सरपंच विठ्ठल बेनिवार यांनी वडनेर पोलिसांना माहिती दिली.

ठळक मुद्देमृतदेह फेकला नाल्यात : आजनगाव-बोदुर्णी मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर : एका वृद्धाचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली. तसेच त्यांचा मृतदेह आजनगाव-बोंदुर्णी रस्त्यालगतच्या नाल्यात फेकून दिला. ही घटना मग्ांळवारी सकाळी ७वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून आणखी आरोपी असल्याची पोलिसांनी शक्यता वर्तविली आहे.रामभाऊ किसन नेवारे (६२) रा. जामठा, जि. नागपूर असे मृताचे नाव आहे. हे दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आज सकाळी आजनगाव-बोंदुर्णी रस्त्यालगतच्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सरपंच विठ्ठल बेनिवार यांनी वडनेर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार आशिष गजभिये, अजय देठे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.मृताचा चेहरा दगडाने ठेचला असल्याने ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मृताच्या कपड्यांची तपासणी केली असता एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीवर असलेल्या पत्तावरुन त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधून घटनास्थळी बोलाविण्यात आले. मृत रामभाऊ यांचा मुलगा रामचंद्र याने मृतदेह वडील रामभाऊ यांचा असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी पुढील तपासला गती दिली. याप्रकरणी सागर येठी, रा.जामठा याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.या प्रकरणामध्ये आणखी तीन आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वडनेर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सखोल तपास सुरु केला आहे.जादूटोण्याच्या संशयातून घडला थरार?मृत रामभाऊ नेवारे यांच्या परिवाराने दोन दिवसापूर्वी हिंगणा पोलिसात तक्रार दाखल करुन अपहार केल्याचा आरोप केला होता. त्यावरुन पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. रामभाऊ यांचा मृतदेह सापडल्यानंतर वडनेर पोलिसांनी तपासला गती देत सागर येठी, रा.जामठा याला ताब्यात घेतले. सागरची प्रकृती नेहमीच खराब राहत होती. त्यामुळे रामभाऊ यांच्यावर जादुटोणा केल्याचा संशय घेऊन त्यांचे अपहरण करीत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. याच दिशेने पोलिसही तपास करीत असल्याचे सांगितले जात आहे.पाच दिवसात दुसरी हत्याहिंगणघाट तालुक्यामध्ये जादुटोण्याच्या संशयावरुन गेल्या पाच दिवसामध्ये झालेली ही दुसरी हत्या आहे. यापूर्वी सिंदी (रेल्वे) नजिकच्या बोरगाव येथे कवडू रंगभान पंधरे याची हत्या करण्यात आली आहे. त्या घटनेच्या तपासादरम्यान काही व्यक्तींना चौकशीकरिता ताब्यात घेतले असतानाच आजनगाव-बोंदुर्णी येथे दुसऱ्या घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी पुढील तपासाकरिता वडनेरचे पोलीस पथक नागपूरला रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Murderखून