सभापतिपदी खडसे, तर उपसभापतिपदी कामनापुरे
By Admin | Updated: August 7, 2015 01:57 IST2015-08-07T01:57:03+5:302015-08-07T01:57:03+5:30
पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक अविरोध झाली.

सभापतिपदी खडसे, तर उपसभापतिपदी कामनापुरे
पुलगाव बाजार समितीवर काँग्रेस-राकाँचा झेंडा
देवळी : पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक अविरोध झाली. बाजार समितीची निवडणूक भारतीय काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या गटाने युती करून लढविली. यामुळे ठरलेल्याप्रमाणे आ. कांबळे यांच्या गटाला सभापतिपद व राष्ट्रवादीचे प्रा. देशमुख यांच्या गटाला उपसभापतिपद देण्यात आले.
बाजार समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेसचे मनोहर खडसे यांची अविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी त्यांचे नाव बाजार समितीचे संचालक अमोल कसनारे यांनी सूचविले तर त्याला अयुबअली पटेल यांनी अनुमोदन दिले. उपसभापती पदासाठी सर्वाधिक २६१ मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादीचे संजय कामनापूरे यांची अविरोध निवड झाली. राजा खेडकर यांनी त्यांचे नाव सुचवून प्रवीण ढांगे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक एस.पी. गुधाणे व सहाय्यक म्हणून एस. डब्ल्यू. कोपुलवार यांनी काम पाहिले. याप्रसंगी माजी आमदार देशमुख, पं.स. सभापती भगवान भरणे, उपसभापती गुलाब डफरे, जि.प.सदस्य मोहन शिदोडकर व मोरेश्वर खोडके, पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसू, दिनेश धांदे, सुनील बासू, सुतगिरणीचे संचालक सुरेश डफरे, माजी जि.प.सभापती अशोक इंगोले, विश्वास येंडे व बाजार समितीचे संचालक मंडळ उपस्थित होती.(प्रतिनिधी)