मृत सांबरामुळे केळझरात खळबळ
By Admin | Updated: August 18, 2015 02:11 IST2015-08-18T02:11:37+5:302015-08-18T02:11:37+5:30
केळझर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या वडगाव शिवारात मुख्य कालव्यात मृत सांबर आढळून आले. याबाबत सोमवारी ग्रामस्थांनी

मृत सांबरामुळे केळझरात खळबळ
सेलू : केळझर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या वडगाव शिवारात मुख्य कालव्यात मृत सांबर आढळून आले. याबाबत सोमवारी ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील सोपस्कार पार पाडले.
केळझर वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वीही अशा घटना उघडकीस आल्या. आता सोमवारी मृत सांबर केळझर मुख्य कालव्यात आढळून आले. सांबराच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवून शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच सांबराच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. पुन्हा एक सांबर मृत आढळल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पाचा पहिला वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला. तो कार्यक्रम पार पडताच दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्याने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)