धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे

By admin | Published: November 30, 2015 02:03 AM2015-11-30T02:03:48+5:302015-11-30T02:03:48+5:30

आज मानवता सगळीकडे लोप पावत आहे. धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे सगळेजण विसरले आहे.

It is important to walk with justice in addition to the conduct of religion | धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे

धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे

Next

ज्ञानेश्वरी दीदी : भागवत कथा सप्ताह
देवळी : आज मानवता सगळीकडे लोप पावत आहे. धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे सगळेजण विसरले आहे. असेच वातावरण राहिले तर प्रलय निश्चित आहे. धर्माच्या आचरणासोबतच संतमहात्म व त्यांचे विचार अंगिकारून न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे असल्याचे ज्ञानेश्वरी दीदी आर्वी यांनी व्यक्त केले.
स्थानिक श्रीसंत खटेश्वर महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहात त्या बोलत होत्या. मानवाने मानवाप्रमाणे वागणे हीच मानवधर्म शिकविणारी कार्यशाळा आहे. आपल्या संस्कृतीला संतांच्या विचारांची जोड आहे. सर्वधर्म समभाव या विशालतेच्या आधारावर आपली प्रणाली कार्यरत आहे. त्यामुळे जात-पात न पाहता वैचारिक पात्रतेला महत्व द्या. आध्यात्मिक अनुष्ठानानुसार आपली जीवनपद्धती असू द्या. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत धर्माचे आचरण करा, असे ज्ञानेश्वरी दीदींनी प्रवचनात सांगितले.
विवाहाचे महत्त्व विषद करताना त्यांनी अनेक दाखले दिले. सृष्टीचे चक्र चालावे यासाठी विवाहाचे महत्त्व आहे. परंतु विवाह संस्काराला आज काळीमा फासला जात आहे. हिंदू धर्मातील १६ संस्कारापैकी एक असलेल्या या संस्काराची पवित्रता राखली जात नसल्याचे शल्य आहे. आज कलियुगाच्या प्रवाहाने हुंड्याच्या वाढत्या मागणीसोबतच लग्नाच्या नावावर पैश्याचे शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे विवाह हा आदर्श असला पाहिजे.
सुसंस्कारिक पिढी जन्माला येण्यासाठी संस्काराचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. वृक्ष किती मोठा झाला यापेक्षा हा वृक्ष लावला कुणी, याची वाच्यता झाली पाहिजे, असेही ज्ञानेश्वरी दिदी म्हणाल्या.
खटेश्वर मंदिर परिसरात पाकशाळा बांधली जात असून त्याचा प्रारंभ खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाला. श्रीमद् भागवत कथेचा समारोप ३० नोव्हेंबरला होत आहे. यादिवशी महाराजांच्या पादुकासहित शोभायात्रा, दिंडी महोत्सव तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: It is important to walk with justice in addition to the conduct of religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.