शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य केंद्राची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

जिल्ह्याच्या अखेरच्या टोकावर असलेल्या अमरावती, नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे यांनी आरोग्य केंद्राला भेट देत केंद्रातील उपाययोजनांचा आढावा घेतला.

ठळक मुद्देसोयी, सुविधांचा घेतला आढावा : विविध उपाययोजनांबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसाहूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन अत्यावश्यक सोयी, सुविधेबाबात वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आरोग्य केंद्राची पाहणी केली.जिल्ह्याच्या अखेरच्या टोकावर असलेल्या अमरावती, नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे यांनी आरोग्य केंद्राला भेट देत केंद्रातील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आवश्यक सोयी-सुविधांबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत, राऊत यांच्यासह वैद्यकीय चमूंशी चर्चा करून दैनंदिन माता-बाल संगोपन व दैनिक लसीकरण व्यवस्थित करण्यात यावे, तापाच्या रुग्णांसाठी वेगळी तपासणी व्यवस्था करण्यात यावी, औषधी साठ्याची तपासणी करून कोविड १९ बाबत जीवनरक्षक साहित्य उपलब्धतेबाबत पाहणी केली, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात सुव्यवस्थेबाबत चौकशी करून उद्यान परिसराची पाहणी केली. एकंदरीत साहूर प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्यविषयक सुव्यवस्था पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर दृगवाडा येथील पोलीस तपासणी नाक्याला भेट देऊन काही आवश्यक सूचना केल्या. लगतच असलेल्या तारासावंगा येथून नागपूर जिल्ह्याची सीमा प्रारंभ होते तर अगदी दीड किलोमीटर दृगवाडा येथून अमरावती जिल्ह्याची सीमा प्रारंभ होते. त्यामुळे इतर जिल्ह्यातून कुणाचाही शिरकाव छुप्या मार्गाने जिल्ह्यात होऊ नये, याची खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.मागील आठवड्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री सुनील केदार यांनी देखील भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, तहसीलदार आशिष वानखडे, गटविकास अधिकारी अनिल गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी कासारे, मंडळ अधिकारी ओमप्रकाश बारस्कर आदींसह वैद्यकीय अधिकाºयांची तसेच पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.कारंजाला जिल्हाधिकाऱ्यांची भेटकारंजा(घा.) : जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी कारंजा शहराला भेट देवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध संस्थाची पाहणी केली. यावेळी सीईओ डॉ. सचिन आेंबासे, एसडीओ हरिष धार्मिक, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, न.प. मुख्याधिकारी पल्लवी राऊत, तहसीलदार सचिन कुमावत, ठाणेदार राजेंद्र गेटे, बीडीओ उमेश नंदागवळी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी सिंदीविहिरी येथे तयार करण्यात आलेल्या २५ खाटांच्या विलगीकरण केंद्राला भेट दिली. कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा उपबाजाराला भेट देऊन लॉकडाऊनचे नियम पाळले जातात किंवा नाही याची पाहणी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीhospitalहॉस्पिटल