अमानुष; मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून विवाहितेस पट्ट्याने बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 17:54 IST2021-09-09T17:52:14+5:302021-09-09T17:54:29+5:30
Wardha News मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून वाद करीत मद्यपी पतीने आणि सासूने विवाहितेस बेदम मारहाण करीत जखमी केले.

अमानुष; मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून विवाहितेस पट्ट्याने बदडले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून वाद करीत मद्यपी पतीने आणि सासूने विवाहितेस बेदम मारहाण करीत जखमी केले. सावळापूर गावात ही लज्जास्पद घटना घडली असून, याप्रकरणी आर्वी पोलिसात पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (The husband beaten wife due to not having a child)
पंचशिला सवई ही रोजमजुरीचे काम करते. तिचे २००९ मध्ये अनंता सवई याच्याशी लग्न झाले होते. तेव्हापासून अनंता दररोज मद्यधुंद अवस्थेत घरी येत होता. अनंता नेहमी विवाहितेला मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून शिवीगाळ करीत असे. अनंता बुधवारी नशेच्या अवस्थेत घरी आला आणि पुन्हा शिवीगाळ करू लागला. दरम्यान, विवाहितेने त्यास हटकले असता अनंता सवाई आणि सासू पंचफुला सवई दोघांनी मूल होत नसल्याच्या कारणातून वाद घालत लाथाबुक्क्यांनी तसेच पट्ट्याने मारहाण करीत तिला जखमी केले. अखेर मार असह्य झाल्याने विवाहितेने याबाबतची तक्रार आर्वी पोलिसात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.