शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

केळीवर ‘करप्या’ रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

सेलू तालुक्यातील खडकी धानोली या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी पिकांच्या बागा आहेत. केळी पिकावर करप्या रोगाने अतिक्रमण केल्याने बागेत असलेले केळीचे पीक गळून खाली पडत आहेत. केळीच्या झाडांची पाने देखील करपायला सुरुवात झाली आहे. तर कुठे-कुठे या रोगाने केळीचे आपोआप झाडे सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने केळी उत्पादक आर्थिक संकटात : १७ ते १८ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकेकाळी सेलू तालुका हा केळी उत्पादनात विदर्भात अव्वल क्रमांकावर होता. परंतु, सध्या परतीच्या पावसाने सेलु तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. मागील आठवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आता केळीच्या पिकावर परतीच्या पावसाने ‘करप्या' रोग आला असून शेतकऱ्यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.सेलू तालुक्यातील खडकी धानोली या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी पिकांच्या बागा आहेत. केळी पिकावर करप्या रोगाने अतिक्रमण केल्याने बागेत असलेले केळीचे पीक गळून खाली पडत आहेत. केळीच्या झाडांची पाने देखील करपायला सुरुवात झाली आहे. तर कुठे-कुठे या रोगाने केळीचे आपोआप झाडे सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खडकी धानोली परिसरातील केळी उत्पादकांवर आर्थिक संकटाचे डोंगर उभे ठाकले असून पुढील पीक कसे घ्यावे, याच विवंचनेत ते आहेत.यावर्षी जिल्ह््यात पावसाचे प्रमाण जास्त होते. परतीचा पाऊस मोठ्याप्रमाणात आला आणि पावसाने केळी पिकांवर करप्या रोग आला. करप्या आल्याने बागेतील केळीच्या झाडांचे पाने सुकली, पाने वाळली, त्यामुळे सूर्यापासून झाडांना मिळणारे अन्नद्रव्य कमी झालं आहे. त्यामुळे केळीचे झाडे स्वत: मुळातून कोलमडून पडत आहेत आणि त्याचा घड खाली पडत आहे. केळीचं एक झाड जगवायला ३०० रुपये लागतात. या भागात ५ हजार ४०० केळींची झाडे आहेत. परतीच्या पावसामुळे जवळ-जवळ १६ ते १७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.शेतकरी सावकारांच्या दारातजिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचे हातचे पीक वाया गेले. सोयाबीन, कपासी, हरभरा, तूर आदी पिकांसह केळीच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असल्याने त्यांच्याकडे सावकारांच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. परिणामी, शेतकरी आत्महत्या करण्यासारखे गंभीर पाऊल उचलत आहे. शासनाने नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या नुकसानीची पहाणी करत त्यांना तत्काळ आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाला. जमिनी वाफया नाही करता आल्या. तीन महिन्यापर्यंत केळीची वाढ झाली नाही. त्यामुळे परतीच्या पावसामुळे आता केळीच्या झाडांवर करप्या रोग आला. परतीच्या पावसाने केळी उत्पादक शेतकºयांचे पुरते कंबरडे मोडले असून करप्या रोगावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. शासनाने याकडे लक्ष देत तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे.कुंदन वाघमारे, केळी उत्पादक,शेतकरीजिल्ह्यामध्ये फळ पिकाखाली ४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जास्तीत जास्त क्षेत्र हे आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यांमध्ये आहे. केळी संदर्भात जी तक्रार झाली आहे. नैसर्गिक आपत्ती या सत्राखाली मोडत नाही, त्यावर करपा रोग आला असल्याची माहिती आहे. त्याठिकाणी आम्ही कृषी विभागाचे अधिकारी पाठवून नेमकं काय झालं ते पाहून केळी उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल.अनिल इंगळे, कृषी अधीक्षक, वर्धा

टॅग्स :agricultureशेती