शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगांतर्गत वैयक्तिक शौचालयाचे प्रोत्साहनपर अनुदान झाले बंद

By admin | Updated: November 16, 2014 23:10 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाकरिता देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान बंद करण्यात आले असून पूर्ण रक्कम स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र

गौरव देशमुख ल्ल वायगाव (नि.)महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाकरिता देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान बंद करण्यात आले असून पूर्ण रक्कम स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. त्यात केंद्र शासनाचे ९ हजार (७५ टक्के) व राज्य शासनातर्फे ३ हजार (२५ टक्के) असा ठरविण्यात आला आहे.केंद्र व राज्य स्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) असे करण्यात आले आहे. हे मिशन देशाच्या पंतप्रधानांनी अंमलात आणले असून यात मुख्य वैशिष्टे सुद्धा देण्यात आली आहे. त्यात वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी प्रोत्साहनपर रक्कम १२ हजार ठरविण्यात आली आहे.इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरातील कार्यरत स्वच्छता गृहासाठी स्वतंत्रपणे अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात येणार आहे. या प्रकारची तरतूद होईपर्यंत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेतून सध्या निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माहिती, शिक्षण, संवादासाठी एकूण प्रकल्प किंमतीच्या आठ टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यापैकी तीन टक्के निधी केंद्र शासनाकडून तर पाच टक्के निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रशासकीय खर्चासाठी एकूण प्रकल्प किमतीच्या दोन टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यापैकी केंद्राचा निधी ७५ टक्के तर राज्याचा निधी २५ टक्के इतका असेल. यामुळे आता योजना राबविताना अडचण जाणार नसल्याची चर्चा अधिकारीवर्गात सुरू आहे.