निवडणुकीच्या तोंडावर दारूविक्रेत्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:22+5:30
सिंदी पोलिसांनी नागपूर-चंद्र्रपूर मार्गावरील बरबडी गावाजवळ नाकाबंदी करून वाहनासह २ लाख ६५ हजार २०० रुपयांची विदेशी अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी अनिल ऋषी रा. देवडा ता. मूलचेरा जि. गडचिरोली व सुनील लक्ष्मण फरकाडे रा. राळेगाव ता. जि. यवतमाळ यांना अटक केली असून त्यांच्यावर कलम ६५ (अ) ६५ (ई) ७७ (अ) ८३ मदाका अंतर्गत कार्यवाही केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर दारूविक्रेत्यांवर छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : सिंदी पोलिसांनी नागपूर-चंद्र्रपूर मार्गावरील बरबडी गावाजवळ नाकाबंदी करून वाहनासह २ लाख ६५ हजार २०० रुपयांची विदेशी अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी अनिल ऋषी रा. देवडा ता. मूलचेरा जि. गडचिरोली व सुनील लक्ष्मण फरकाडे रा. राळेगाव ता. जि. यवतमाळ यांना अटक केली असून त्यांच्यावर कलम ६५ (अ) ६५ (ई) ७७ (अ) ८३ मदाका अंतर्गत कार्यवाही केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी चंद्रभान मेघरे यांना वाहनांमध्ये दारू येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून मेघरे यांनी तातडीने त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी पो. ना. प्रकाश मैंद, यांना घेऊन नागपूर-चंद्रपूर मार्गावरील बरबडी गावाजवळ नाकाबंदी करण्यात आली. यावेळी ३२ एए ५६०७ क्रमांकाची टाटा इंडिका विस्टा कार थांबवून गाडीची झडती घेण्यात आली. त्यात गाडीच्या समोरील डॅश बोर्ड व मागील शीट खाली लपवून ठेवलेले विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी दारूसह २ लाख,६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कार्यवाही पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभान मेघरे, प्रकाश मैंद यांनी केले.
६८ हजार १०० रुपयांचा दारूसाठा जप्त
आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा होतो. कायदा व सुव्यवस्था बाधीत ठेवण्याकरिता देवळीचे ठाणेदार नितीन लेव्हरकर, यांनी पाऊ ल उचलले. देवळीच्या हद्दीत दारूच्या कारवाई प्रभावी होण्याकरीता सतत गस्त व पेट्रोलिंग वाढविली. वाहन क्रमांक एमएच ३२ डब्ल्यू ३७९३ यावर विदेशी दारूची ४५ बाटल्या ३४ हजार १०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. नाकाबंदीमध्ये एमएच ३२ ए.ए.४९३२ यावर विदेशी दारूची वाहतूक करीत असतांना विदेशी दारूच्या ४८ बाटल्या एकूण ३४ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही कारवाईमध्ये आरोपी उत्कर्ष मून व इतर दोन व्यक्ती सर्व रा.गौरक्षण वॉर्ड देवळी तसेच २ मोहित रामचंद्र गोदवानी, अमोल मिलिंद ब्राह्मणे दोन्ही रा.स्टेशन फैल वर्धा यांना अटक करण्यात आली आहे.