व्याघ्र प्रकल्पाच्या मंजुरीने वाढले बोरचे महत्त्व

By Admin | Updated: July 3, 2014 23:42 IST2014-07-03T23:42:36+5:302014-07-03T23:42:36+5:30

नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण असलेल्या आणि वाघासह विविध प्राणी व पक्ष्यांचा अधिवास असलेल्या जिल्ह्यातील बोर अभयारण्याला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने वाघासाठी संरक्षित

Importance of borer increased by the approval of Tiger project | व्याघ्र प्रकल्पाच्या मंजुरीने वाढले बोरचे महत्त्व

व्याघ्र प्रकल्पाच्या मंजुरीने वाढले बोरचे महत्त्व

वर्धा : नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण असलेल्या आणि वाघासह विविध प्राणी व पक्ष्यांचा अधिवास असलेल्या जिल्ह्यातील बोर अभयारण्याला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने वाघासाठी संरक्षित असलेला ‘व्याघ्र प्रकल्प’ म्हणून आरक्षित केला आहे. ताडोबा, मेळघाट यानंतर राज्यातील हा सहावा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे.
वन्यजीव अभयारण्य म्हणून १९७० मध्ये शासनाने या प्रकल्पाला मान्यता दिली होती. वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर १३८.१२ चौरस किलोमिटर परिसरात हा प्रकल्प विस्तारलेला आहे. व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाल्यामुळे व्याघ्र वन्यप्राणी व विविध प्रजातींच्या संरक्षणाला यामुळे गती मिळणार आहे.
बोर नदीच्या परिसरातील समृद्ध निसर्ग आणि समृद्ध वनराई असलेल्या दक्षिण सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये बोर व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार आहे. या अभयारण्याच्या परिसरात नवरगाव, गरमसूर, महाकाली, ढगा, बांगडापूर, गारपीट, शिवणफळ, ताडगाव, पोहणा हा निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. बोर अभयारण्य व न्यू बोर अशा एकूण १३८.१२१४ किलोमिटर परिसरात या प्रकल्पाचा विस्तार आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणाऱ्या बोर या नदीवरील सिंचन प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ३७६.३२ कि़मी. आहे. धरणातील संपूर्ण जलसाठा १३८.७५ द.ल.घ.मी. असून, उपयुक्त पाणीसाठा १२७.४२ द.ल.घ.मी. आहे. पूर्ण संचय पातळी ३३०.४० मीटर आहे. अभयारण्यामधून वाहणाऱ्या बोर नदीवर हे धरण उभारले असून १९७० साली पूर्ण झाली आहे. या धरणाला यशवंत जलप्रकल्प म्हणूनही ओळखल्या जाते.
बोर अभयारण्याची ओळख विपूल जैवविविधतेसाठी असून, येथे बोर नदीत मत्स्यजन्य प्राणी, जलचर, पक्षी व फुलांच्या वनस्पतीची रेलचेल दिसून येते. फुल आणि पक्षी यांना विशिष्ट ऋतूमध्ये आवश्यक असणारे नैसर्गिक खाद्य येथे विपूल प्रमाणात उपलब्ध होत असते. उपयुक्त वनस्पतींमध्ये, कॉसिया, टोरा, टेतेला, कॅसिया अ‍ॅटी कळटा, ट्रीबूलस टेरिटेरीज, फ्लेमेगिया, वनभेंडी, वेलची, वाघोरी या वनस्पतींसह उपयुक्त पिळदरा बांबू, सागाचे जंगलही आढळून येते.
या अभयारण्यात नुकतीच नागपूर व वर्धा जिल्ह्यातील १६ चौरस किलोमिटरची पुन्हा भर पडली असून, केंद्र सरकारने बोर अभयारण्याला वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केले आहे. नव्याने उदयास आलेल्या या व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघ, बिबट याबरोबरच अनेक प्राणी मुक्तसंचार करताना दिसतात. अस्वली, रानडुक्कर, निलगाय (रोही), सांभार, चितळ, भेडकी, लांडगे, कोल्हे, रानकुत्री, रानमांजर, खवले-मांजरे, साळींदर, मसण्या उद, उडती खार आणि मोरांसोबतच सर्व गरूड, तुर्रेवाले गरूड, बहिरी ससाणा आणि अनेक पक्षी या जंगलात नोंद पक्षी निरीक्षक डॉ. सगिम अली आणि मारूती चित्तमपल्ली यांनीही पक्षीनिरीक्षण केले आहे. नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणनेनुसार बोर वाघ्र प्रकल्पामध्ये ४ वाघ, ८ ते १० बिबट,७०० चितळ, ५०० सांभार, २५ अस्वली, १५ चिकारा, चौसिंगा, रानकुत्रे, निलगाय, रानडुक्कर, उदमांजर, सायाळ, मोर, लांडोर आदी वन्यप्राण्यांचा अदिवास असल्याची नोंद झाली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Importance of borer increased by the approval of Tiger project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.