शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळूसाठा चोरी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी १७ जानेवारीला तळेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. ३० ब्रास वाळूसाठा चोरी प्रकरणाच्या तपासात अद्याप सत्य पुढे न आल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.

ठळक मुद्देचर्चेला फुटले पेव : अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी व्यक्त होतेय आश्चर्य

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : वर्धा नदीघाटातून अज्ञाताने अवैध वाळूची वाहतूक करीत मौजा काकडदरा येथील कब्रस्तानात ३० ब्रास रेती (किंमत १ लाख २० हजार रुपये) ची साठवणूक केली होती. हा वाळूसाठा मंडळ अधिकारी तळेगाव व सहकाऱ्यांनी १६ जानेवारीला रात्रीच्या सुमारास पंचनामा करुन जप्त करण्यात आला होता.जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी १७ जानेवारीला तळेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. ३० ब्रास वाळूसाठा चोरी प्रकरणाच्या तपासात अद्याप सत्य पुढे न आल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.३० ब्रास वाळूची चोरी होणे हे दोन-चार तासांच्या कालावधीचे काम नसून इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला वाळूसाठा उचलून नेण्याकरिता चार ते पाच ट्रॅक्टरला ८ ते १० तासांचा कालावधी नक्कीच लागत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.८ ते १० तासाच्या कालावधीत रेती चोरटे कुणाच्या कसे निदर्शनास पडले नाही? यात मोठे अर्थकारण घडले असावे काय, त्यामुळेच वाळूचोरी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात पडला नसावा, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाले आहे.कापसी घाटातून अवैध वाळूउपसामोझरी (शे) - नजीकच्या कापसी येथील वर्धा नदीतून वाळूतस्तकरांकडून रात्रंदिवस वारेमाप चोरट्या मार्गाने वाळूउपसा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू आहे. यात शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष का, असा नागरिकांचा सवाल आहे. कापसी घाटातून कापसी-मोझरी शेकापूरमार्गे ट्रॅक्टरद्वारे वाळूचोरीचा गोरखधंदा बिनदिक्कमतपणे सुरू असतो. वाळूतस्कारांनी मार्गावर ठिकठिकाणी खबरे तैनात केलेले असतात. चोरीची वाळू भरलेली वाहने कुठल्याही अधिकाºयांच्या हाती लागू नये म्हणून कानगाव, मोझरी, कापसी येथून शासकीय वाहनांवर पाळत ठेवली जाते. खबºयांकडून तस्करांना माहिती पुरविली जाते. वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे कापसी ते मोझरी तसेच कालव्यांनी निघणाºया मार्गाची प्रचंड दुर्दशा झाली आहे. असे असताना वाळूतस्करांना पाठीशी का घालण्यात येत आहे, असा नागरिकांचा सवाल आहे. वाळूतस्करांवर कारवाई करून शासनाचा महसूल वाचवावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :sandवाळू