शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 8, 2014 00:06 IST

जिल्ह्यातील बोर व अन्य कालव्याच्या दुरूस्तीच्या कामांना उन्हाळा संपायला येऊनही अद्याप सुररुवात झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्त्यांना गती देण्याची मागणी किसान अधिकार

वर्धा : जिल्ह्यातील बोर व अन्य कालव्याच्या दुरूस्तीच्या  कामांना उन्हाळा संपायला येऊनही अद्याप सुररुवात झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्त्यांना गती देण्याची मागणी किसान अधिकार अभियाच्यावतीने निवेदनाद्वारे विभागीय अधीक्षक अभियंता जे. एम. शेख यांना करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान अभियानच्यावतीने शेख यांना विचारणा केली असता संबंधित कालव्यांच्या दुरूस्तीच्या कामाचे कंत्राट अजूनही पारित झाले नसल्याची माहिती देण्यात आली. जिल्हा सिंचन विषयक आढावा बैठक सेलू तालुक्यातील बोर धरण येथील सिंचन विभागाच्या विश्राम गृहावर घेण्यात आली. यात चंद्रपूर विभागीय अधीक्षक अभियंता जे. एम. शेख यांना किसान अधिकार अभियानचे मुख्यप्रेरक अविनाश काकडे व जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी निवेदन सादर केले व कॅनालच्या लिकेजेस व जर्जर अवस्थेची माहिती दिली.पावसाळ्याला केवळ १५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. इस्टीमेट पारीत करण्यास वेळ लावल्यास आवश्यक दुरूस्त्यांची कामे होणार केव्हा? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात त्याचा वाईट परिणाम पावसाळ्यात व रबीच्या हंगामात परिसरातील शेतकर्‍यांना व स्थानिक नागरिकांना भोगावा लागेल. आपल्या व्यवस्थापकीय अनियमिततेचा त्रास शेतकर्‍यांना होऊ नये याकरिता विविध उपाययोजना आखण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक लोकसमित्यांची स्थापना गावा-गावात पुन्हा करून आवश्यक ती कामे तत्काळ करण्याचे आदेश उपस्थित कार्यकारी अभियंता ढवळे व सहाय्यक अभियंत्यांना शेख यांनी दिले. कार्यालयीन त्रुटी शोधण्यात वेळ निघून जातो त्यामुळे कामाला गती देण्यास जिल्ह्यातील अधिकार्‍यांना आदेश द्यावे असे निवेदन किसान अधिकार अभियान तर्फे करण्यात आले. निवेदन अभियानचे  सेलू तालुकाध्यक्ष विठ्ठल झाडे, वर्धा तालुकाध्यक्ष भाऊराव काकडे, गोविंदा पेटकर, एकनाथ बरबडीकर, आशिष राऊत, भैय्यासाहेब दरणे, गजानन नेहारे आदींचा सहभाग होता.(प्रतिनिधी)