शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

थंडीत कुडकुडत ठेवाल तर जेसीबी पेटवून हात शेकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 21:22 IST

शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता रबी हंगामावर त्यांची आशा असताना ऐन रबी हंगामाची लगबग सुरू होताच सालोड परिसरातील निम्न वर्धा प्रकल्पाचा उपकालवा फोडण्यात आला. याच कालव्याच्या पाण्यावर परिसरातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांच्या सात हजार हेक्टरमधील पिकांना सिंचनाची सोय होत होती. त्यामुळे आता या सर्व शेतकऱ्यांना सिंचनापासून मुकावे लागणार असल्याने चणा व गहू पिकेही घेता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ऐन रब्बी हंगामाच्या तोंंडावर नागपूर- नांदेड रेल्वे मार्गाकरिता सालोड (हिरापूर) येथील निम्न वर्धा प्रकल्पाचा उपकालवा फोडण्यात आला. त्यामुळे या परिसरातील तब्बल सात हजार हेक्टरवरील सिंचन अडचणीत आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत खोदकाम केलेल्या खड्ड्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावर लवकर तोडगा काढला नाही आणि थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली तर येथील जेसीबी पेटवून हात शेकवू, असा संताप व्यक्त करून प्रशासनाला इशारा दिला आहे.शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता रबी हंगामावर त्यांची आशा असताना ऐन रबी हंगामाची लगबग सुरू होताच सालोड परिसरातील निम्न वर्धा प्रकल्पाचा उपकालवा फोडण्यात आला. याच कालव्याच्या पाण्यावर परिसरातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांच्या सात हजार हेक्टरमधील पिकांना सिंचनाची सोय होत होती. त्यामुळे आता या सर्व शेतकऱ्यांना सिंचनापासून मुकावे लागणार असल्याने चणा व गहू पिकेही घेता येणार नाही.यासोबतच जनावरांच्या वैरणाचाही मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याने निम्न वर्धा प्रकल्प कार्यालय व जिल्हा प्रशासनाने रेल्वे विभागाला खोदकाम करण्याची परवानगी देऊ नये, अशी विनंती निवेदनातून केली होती; परंतु शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने रेल्वे विभागाला परवानगी दिल्याने हा उपकालवा फोडण्यात आला. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आता रब्बी हंगामापासून वंचित राहणार असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीकरिता खोदकाम केलेल्या खड्ड्यात बसून मंंगळवारी सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते; पण यावर कोणताही तोडगा निघाला नाही. या आंदोलनाची प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही आणि येथेच थंडीमध्ये रात्र काढावी लागली तर तीव्र आंदोलन करू, वेळेप्रसंगी  महामार्गावर  मुला- बाळांसह रास्ता रोको करू, असा इशाराही  दिला. त्यामुळे  प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली असून ते या आंदोलनाकडे लक्ष देऊन आहे.

तिरंगा ध्वज घेऊन शेतकऱ्यांचा एल्गार- प्रशासनाला पूर्वीच विनंती केल्यानंतरही शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता येथे रेल्वेच्या कामाकरिता चक्क उपकालवा फोडून दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांना संकटात लोटले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळपासून किसना देवतळे या शेतकऱ्यांच्या नेतृत्वात हाती तिरंगा ध्वज घेऊन आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाची माहिती मिळताच खासदार रामदास तडस, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत, सावंगीचे ठाणेदार धनाजी जळक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंखे यांनी भेट देऊन आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या.

निम्न वर्धा प्रकल्पाचे अधिकारी निगरगट्ट- शेतकऱ्यांना सिंचनाकरिता वेळोवेळी पाणीपुरवठा करून त्यांच्या उत्पादन वाढीस भर घालण्याची जबाबदारी निम्न वर्धा प्रकल्प अधिकारी कार्यालयाची आहे; परंतु, या कार्यालयाने ऐन सिंचनाच्या हंगामातच रेल्वेला उपकालवा फोडण्याची परवानगी देऊन शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवले. इतकेच नाही तर आज आंदोलनस्थळी खासदार रामदास तडस यांनी भेट देऊन निम्न वर्धा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी कार्यकारी अभियंता किंवा शाखा अभियंताऐवजी कनिष्ठ अभियंत्याला या ठिकाणी पाठविले. त्यामुळे हा विभाग शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती निगरगट्ट असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

मदत काय देणार, याचे लेखी आश्वासन द्या!- अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे आधीच तोंडचा घास हिरावला आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत मिळाली असून ही मदत केवळ तोंडाला पाने पुसणारी ठरली आहे. रब्बीवर आशा होती; पण तीही प्रशासनाने आमच्याकडून हिरावून घेतली आहे. त्यामुळे गहू व चण्याचे पीक घेता येणार नसल्याने प्रशासन शेतकऱ्यांना हेक्टरी काय मदत देणार. यासोबतच जनावरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण होणार असून त्यासंदर्भात काय तोडगा काढणार, हे लेखी स्वरूपात द्यावे. तेव्हाच आंदोलन मागे घेऊ, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :agitationआंदोलन